दौंड येथील एका महिलेने मंत्रालयाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे. ही महिला वकील असून तिने दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांनी यांच्याविरुद्ध तक्रार करत असे टोकाचे पाऊल उचलले आहे. महिलेच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे महिलेने आज (२९ नोव्हेंबर) मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पुणे जिल्ह्यातील दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने मुंबईत येऊन मंत्रालय परिसरात तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्येच्या प्रयत्नाचा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा:
हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत ठाकरे सरकार
महाराष्ट्राची डोकेदुखी वाढली! साऊथ आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?
भाईंदरमध्ये फेरीवाल्याकडून पालिका अधिकाऱ्यावर रॉडने हल्ला
अनेकदा संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार करुनही कारवाई केली जात नव्हती. पोलिसांकडून महिलेवरच गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाद मागण्यासाठी वकील महिला वारंवार वरिष्ठ पोलिसांची भेट घेत होती, तरीही न्याय मिळत नसल्याचा आरोप करत तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. महिलेने तिसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले असून सबंधित महिला मरिन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात आहे.