सुप्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील व प्रसिद्ध सिनेपटकथाकार सलीम खान यांना देण्यात आलेली धमकी ही पंजाबमधील लॉरेन्स बिष्णोई गँगने दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही दिवसांपूर्वी बिष्णोई गँगने सलमान खान आणि सलीम खान यांच्या नावे धमकीच पत्र ठेवलं. सलीम खान हे सकाळी फिरायला गेलेले असताना ते नेहमी बसतात त्या बाकड्यावर चिठ्ठी ठेवलेली होती त्यात सलमानचा मुसेवाला करण्याची धमकी देण्यात आली होती. त्यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू होता.
हे पत्र ठेवण्यासाठी बिष्णोई गॅंगमधील तीन गुन्हेगार मुंबईत आले होते.या तीनही आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केलेला सौरभ महाकाल भेटला होता.या सर्व आरोपींची कल्याणमध्ये भेट झाली होती. जे तीन आरोपी आले होते ते राजस्थानमधल्या जालोरमधून मुंबईत आले होते. तिघांनीही सौरभ महाकालला धमकीच पत्र ठेवण्यासाठी सोबत बोलावलं मात्र तो गेला नाही.
अटक आरोपी सौरभ महाकालने चौकशीदरम्यान केला मोठा खुलासा. त्याच्यासोबत संतोष जाधव या शार्प शूटरचाही पोलिस शोध घेत आहेत. तो हरयाणा, पंजाब वगैरे ठिकाणी वावरत असल्याचे समोर आले आहे.
लॉरेन्स बिष्णोई गँग ही पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणात चर्चेत आली आहे. बिष्णोई गँगनेच मुसेवालाची हत्या केल्याचा आरोप होतो आहे. बिष्णोई सध्या तुरुंगात आहे, पण मुसेवालाला आर्थिक रसद पुरविणारे हे बिष्णोई गँगचे विरोधक असल्यामुळे त्यांनी मुसेवालाचा काटा काढला असे म्हटले जात आहे. बंदुका, रायफल्स घेऊन गाणी सादर करणे हे मुसेवालाचे वैशिष्ट्य आहे.