उज्ज्वल निकम म्हणतात, नितेश राणे प्रकरणाचा निष्कारण फुगा केला गेला!

उज्ज्वल निकम म्हणतात, नितेश राणे प्रकरणाचा निष्कारण फुगा केला गेला!

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी नितेश राणे प्रकरणावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण फार मोठे नाही. त्याचा फुगा विनाकारण वाढविण्यात आला आहे.

नितेश राणे यांना बुधवारी कणकवली न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. त्याआधी, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यावेळी टीव्ही ९ ने निकम यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी या प्रकरणातील प्रश्नांवर उत्तरे देताना निकम यांनी रोखठोक विधान केले.

निकम म्हणाले की, हे प्रकरण फार मोठे नाही. याचा फुगा करण्यात येत आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक चॅनल हा फुगा वाढवत आहेत. राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडे दिलेल्या जबाबांनी महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्या मुद्द्यांपेक्षा प्रसारमाध्यमांनी नितेश राणे यांचे प्रकरण लावून धरल्याचे दिसले. त्यामुळेच निकम यांनी उपरोक्त भूमिका घेतली असावी असे बोलले जात आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुख म्हणाले की, पोलिसांच्या पोस्टिंगची यादी अनिल परब देत असत!

वाझेच्या नियुक्तीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंकडून थेट आदेश!

‘वाईन विक्रीचा निर्णय चुकीचा असल्याचा ठाकरे सरकारला पवारांचा सल्ला’

‘परमबीर सिंगच अँटिलिया स्फोटके प्रकरणात मास्टरमाईंड’

 

नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

त्यानंतर नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. म्हणजेच ४ फेब्रुवारीपर्यंत ते पोलिस कोठडीत असतील. अर्थात. त्यानंतर शनिवार, रविवार असल्यामुळे ते पोलिस कोठडीतच राहतील का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता पोलिस कोठडीत त्यांची संतोष परब मारहाण प्रकरणात चौकशी केली जाईल. त्यातून काय निष्पन्न होते हे येत्या काळात स्पष्ट होईल.

Exit mobile version