तोतया न्यायाधीशाला लातूर पोलिसांकडून अटक

हायकोर्टाचे न्यायाधीश असल्याचं सांगून पोलीस, आमदारांनाही बनवलं

तोतया न्यायाधीशाला लातूर पोलिसांकडून अटक

मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असल्याचे भासवून गंडा घालणाऱ्या तोतया न्यायाधीशाला अटक करण्यात आली आहे. हायकोर्टाचे न्यायाधीश असल्याचं सांगून पोलीस आमदारांनाही आपल्या शब्दाच्या खेळीत न्यायाधीश असल्याचे भासवलं. काही दिवसांनंतर पोलिसांना लक्षात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तोतया न्यायाधीश आता पोलिसांच्या ताब्यात आहे. लोकं आपल्या प्रसिद्धीसाठी, मोठेपणाचा वावं आणून दाखवण्यासाठी कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही. अशीच घटना लातूर शहरामध्ये मध्ये घडली. अमीरअली सय्यद असे तोतया न्यायाधीशाचे नाव आहे. आरोपी लातूर शहरातील इंडिया नगरमधील आहे. त्याचं मूळ गाव शिवणखेड असून त्याने एलएलबी केल्याचा दावा केला जातोय.

त्यानंतर त्यांनी काही काळ लातूरमधील ज्येष्ठ वकिलाकडे ज्युनिअर शिपही केली. त्यानंतर दीड दोन वर्षांपूर्वी तो अचानक गायब झाला. त्यानंतर माझी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याचं सांगत तो अचानक अवतरला. काही दैनिकांत उत्कृष्ट न्यायाधीश म्हणून पुरस्कार मिळाल्याच्या बातम्याही छापून आल्या. त्यानंतर शिवणखेड गावात त्याचा सत्कार आयोजित केला. गावचा तरूण मुंबई उच्च न्यायालयाचा न्यायाधीश झाल्याचा गावाला आनंद झाला. सत्कारासाठी अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील गावात आले. या सत्कार कार्यक्रमाला त्यांच्या ताफ्यात पोलिसांच्या तीन वाहनं होती.
सद्याचा सोशल मीडियाचा जमाना आहे. जगात कोणतीही घटना घडली की त्वरित त्याची माहिती मिळते.

हे ही वाचा:

अमेरिकेतील शाळांमध्ये लवकरच मिळणार ‘हिंदी’चे धडे

समृद्धी एक्स्प्रेसवे अपघात टायर फाटल्यामुळे नाही तर चालकाच्या डुलकीमुळे?

“त्या दुर्दैवी मृतकांना ‘शरदवासी’ म्हणायचे का?”

गुजरात उच्च न्यायालयाने तिस्ता सेटलवाडचा जामीन अर्ज फेटाळला

या सोशल मीडियामुळेच तोतया न्यायाधीशाचा खरा चेहरा जनतेसमोर आला. सत्कार समारंभ झाल्या नंतर आमदार बाबासाहेब पाटील यांच्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर गावात चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर त्याचं बिंग फुटलं. अनेक मोठ्या दैनिकात उत्कृष्ट न्यायाधीश म्हणून पुरस्कार मिळाल्याच्या बातम्या देखील छापून आल्या. मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या या तरुणाने घरातल्या लोकांनाही खोटी माहिती दिली होती. लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना त्याने काही दिवसापूर्वी फोन केला. लातूर येथील फॅमिली कोर्टात मी न्यायाधीश आहे. सरकारी कामासाठी मला अहमदपूर येथील शिवणखेडला जायचं आहे. पोलीस बंदोबस्त पाठवून द्या, असं सांगत पोलीस बंदोबस्त मागून घेतला.

पोलिसांची गाडी आणि त्याच्या कुटुंबियांची गाडी घेऊन तो त्याचे मूळ गाव शिवणखेडमध्ये दाखल झाला. त्या वेळेस अहमदपूर पोलीस ठाण्यातूनही पोलीस गाड्या त्याच्या सेवेत दाखल झाल्या होत्या आपल्या मतदारसंघातील तरुण न्यायाधीश झालाय त्याचं कौतुक करायला आमदार देखील त्याचे कौतुक करण्यासाठी दाखल झाले होते. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी गावातील विविध विकास कामाचा उद्घाटन या तोतया न्यायाधीशाच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर लातूर कोर्टात याघटनेची बाबत जोरदार चर्चा रंगली. लातूर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी क्रॉस व्हेरिफिकेशन केलं.

त्यानंतर लातूर पोलिसांची चांगलीच गोची झाली. पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी त्याचाशी गोड बोलून आपल्या जाळ्यात अडकवून या तोतया न्यायाधीशास सोलापुरातून ताब्यात घेतलं. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचे रूप दाखवलं. मग तोतया न्यायाधीशाला आपली चोरी पकडल्याचे लक्षात आले. मी खोटे बोलून हे केल्याची कबुली त्याने दिली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.

Exit mobile version