जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; आंदोलकांकडून जाळपोळ

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरू होते

जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; आंदोलकांकडून जाळपोळ

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात मोठा गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीमार केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे आंदोलकांनी आक्रमक रूप धारण केले असून जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी २९ ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. मात्र, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तसेच आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. आंदोलकांकडूनही दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. धुळे- सोलापूर रस्त्यावर आंदोलकांनी बस आणि वाहनांची जाळपोळ सुरु केली असून या रस्त्यावरील वाहतूक स्थगित करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

भारतात होणाऱ्या जी- २० परिषदेत शी जिनपिंग यांची अनुपस्थिती म्हणजे पळवाट?

पहाड खोदून लोगो सुद्धा काढता आला नाही हो यांना…

शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही…मुंबईत लागले पोस्टर्स

शेवटपर्यंत मातीशी एकनिष्ठ राहणार

जालन्यातील उपोषण आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर काही कारण नसताना लाठी हल्ला झाला. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले.

Exit mobile version