दिल्लीतून लष्कर-ए-तैयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे.जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या या सक्रिय दहशतवाद्याला नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आले आहे.दहशतवादी रियाझ अहमद राथेर असे आरोपीचे नाव आहे.दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली.
दिल्ली पोलिसांनी रविवारी (४ फेब्रुवारी) रोजी या दहशतवाद्याला अटक केली होती.रेल्वे पोलिसांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून आरोपीला अटक केली होती.दिल्ली रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने एलओसी ओलांडून शस्त्रे आणि दारूगोळा मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आरोपी हा निवृत्त सैनिक आहे. तो कोणत्या उद्देशाने दिल्लीत आला होता हे अद्याप कळू शकलेले नाही.पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
हे ही वाचा:
वंदे भारतनंतर ठाकरेंना बुलेट ट्रेनचीही सफर घडविणार
मध्यप्रदेशातील फटाका कारखान्यात स्फोट, ११ जणांचा होरपळून मृत्यू तर ६० जण जखमी!
पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामगिरी घरोघरी पोहोचवणार
बाळा नांदगावकरांनी राज ठाकरेंना दिली बाबरीची वीट
डीसीपी रेल्वे केपीएस मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी रियाझ अहमद राथेर हा जम्मू आणि काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्यातील न्यू गाबरा गावातील रहिवासी आहे.पोलिसांनी पुढे सांगितले की, शस्त्रे आणि दारूगोळा मिळविण्यासाठी आरोपी रियाझ अहमद राथेर हा खुर्शीद अहमद राथेर आणि गुलाम सरवर राथेर यांच्यासोबत मिळून एलओसी ओलांड़ून दहशतवादी हँडलर्सशी समन्वय साधण्याच्या कटात त्याचा सहभाग होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एक मोबाईल फोन आणि एक सिमकार्ड जप्त करण्यात आले आहे. आरोपी रियाझ अहमद याला कायद्याच्या योग्य कलमांतर्गत अटक करण्यात आली असून पुढील आवश्यक कारवाईसाठी जम्मू-काश्मीरच्या संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे.