लश्कर-ए-तैयबाच्या मॉड्यूलचा भंडाफोड

जम्मू-काश्मीरच्या दोघांना शस्त्रांसह अटक

लश्कर-ए-तैयबाच्या मॉड्यूलचा भंडाफोड

पंजाब पोलिसांनी लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला आहे. पंजाब पोलिसांनी शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या दोन दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी), दोन हॅण्डबॉम्ब, एक पिस्तूल, दोन मॅगझिन, २४ काडतुसे, एक टायमर स्विच, आठ डिटोनेटर आणि चार बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत.

अमृतसर पोलिसांच्या राज्य स्पेशल ऑपरेशन सेलने केंद्रीय एजन्सीच्या सहकार्याने ही कारवाई केली. पोलीस आणि एजन्सी दोघेही चौकशी करत असून त्यांची योजना काय होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी काही मोठा कट रचण्याची योजना आखली होती का? याचाही तपास करण्यात येत आहे.

पंजाब पोलिसांनी ट्विट करत म्हटले की, “एसएसओसी-अमृतसरने केंद्रीय एजन्सीसह संयुक्त ऑपरेशनमध्ये एलईटी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आणि दोन लोकांना अटक केली. हे दोघेही जम्मू-काश्मीरचे रहिवासी आहेत. त्यांच्याकडून दोन आयईडी, दोन हॅणडबॉम्ब, दोन मॅगझिनसह एक पिस्तूल, २४ काडतुसे, एक टायमर स्विच, आठ डिटोनेटर आणि चार बॅटरी जप्त करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

भारत पाक सामन्यात स्विगी, झोमॅटोकडून भारताला अनोख्या शुभेच्छा

इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार

मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंडला पुण्यातून अटक

इस्रायलकडून गाझामध्ये छापे; ‘ही तर केवळ सुरुवात’ नेतान्याहू यांचा इशारा

दहशतवादी मॉड्यूल लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी फिरदौस अहमद भट हाताळतो. पंजाबमधील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलला मोठा धक्का बसला आहे. पंजाबला पुन्हा एकदा अस्थिर करण्याचा या मॉड्यूलचा डाव होता.

Exit mobile version