अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा !

भारतीय सैन्याला मोठं यश

अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा !

भारतीय सेना मागील सात दिवसांपासून अनंतनागमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम चालवत आहे. यातच भारतीय सेनेला आता मोठं यश आलं आहे. मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उझैर खान याचा समावेश आहे.

एडीजीपी पोलिस विजय कुमार यांनी या संदर्भांत माहिती दिली ते म्हणाले, अनंतनाग चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले यामध्ये लष्कर-ए-तैयबा (एलईटी) कमांडर उझैर खान याचा समावेश आहे. तसेच तिसर्‍या दहशतवाद्याचा मृत्यू झाल्याचा संशय अधिकाऱ्यांना असून त्याच्या मृतदेहाचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.दहशतवाद्याकडून एक शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. अधिका-याने सांगितले की उझैर खानच्या मृत्यूसह, अनंतनागमध्ये सात दिवस चाललेल्या चकमकीचा समारोप झाला असला तरी शोध मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

रोहित शर्मा म्हणाला, आशिया कप जिंकला, आता लक्ष विश्वचषकाकडे

सरकार येईल जाईल पण हा देश टिकला पाहिजे !

कोटामध्ये विद्यार्थ्यांचा जीव का घुसमटतोय?

‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?

हा एक मोठा परिसर आहे ज्याचा शोध घेणे बाकी आहे. तेथे बरेच स्फोट न झालेले शेल असू शकतात जे परत मिळवून नष्ट केले जातील. आम्ही लोकांना त्या भागात न जाण्याचे आवाहन करतो,” ते पुढे म्हणाले.एडीजीपी म्हणाले की, तेथे दोन ते तीन दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. “तिसरा मृतदेह कुठेतरी असण्याची शक्यता आहे. शोध पूर्ण झाल्यानंतर कळेल,” कुमार म्हणाले.

Exit mobile version