लँड फॉर जॉब घोटाळा: लालू प्रसाद यादव यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन

लालू प्रसाद यादव यांची मुले तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव यांनाही जामीन मंजूर

लँड फॉर जॉब घोटाळा: लालू प्रसाद यादव यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन

दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव यांना लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, न्यायालयाने सर्व आरोपींना त्यांचे पासपोर्ट जमा करण्यास सांगितले आहे.

लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने लालू कुटुंबीयांना जामीन मंजूर केला आहे. सोमवार, ७ ऑक्टोबर रोजी लालू आणि त्यांची मुले सकाळी १० वाजता दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर झाले होते. आरोपींना दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले, ज्यामध्ये लालू यादव आणि त्यांची मुले तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादवही न्यायालयात हजर झाले.

दरम्यान, लालू यादव यांच्यासह सर्व नऊ आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. प्रत्येकाला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला गेला. शिवाय अट म्हणून प्रत्येकाला त्यांचे पासपोर्ट सरेंडर करावे लागणार आहेत. आता या प्रकरणी पुढील सुनावणी २५ ऑक्टोबरला होणार आहे.

हे ही वाचा : 

आप खासदार संजीव अरोरा यांच्या घरावर ईडीचा छापा!

चेन्नईमध्ये एअर शो बघायला लाखोंची गर्दी; पाच जणांचा मृत्यू

चिनी नागरिकांना लक्ष्य करून कराचीमधील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आत्मघाती हल्ला

दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ – शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी!

ईडीने आरोपींविरुद्ध ६ ऑगस्ट रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. ईडीने आपल्या आरोपपत्रात लालू यादव यांना या घोटाळ्याचे सूत्रधार म्हणून संबोधले होते. यातील चार आरोपींचा मृत्यू झाला आहे. लालू आणि तेज प्रताप यादव यांच्यासह नऊ आरोपींविरुद्ध ईडीच्या आरोपपत्रावर न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधित सर्व लोकांविरुद्ध समन्स जारी केले आहेत.

२००४ ते २००९ या काळात रेल्वेमंत्री असताना लालू यादव यांनी ‘ग्रुप डी’ मधील लोकांना नोकऱ्या दिल्या आणि त्यांच्या जमिनी आपल्या नावावर केल्याचा आरोप आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालू यादव यांनी त्यांची जमीन घेऊन त्यांना रेल्वेच्या ‘ग्रुप डी’मध्ये नोकरी दिल्याची पुष्टी अनेकांनी त्यांच्या वक्तव्यातून केली आहे.

Exit mobile version