ललित पाटीलची प्रकृती पुन्हा बिघडली

पोलीस कोठडीतच उपचार सुरू

ललित पाटीलची प्रकृती पुन्हा बिघडली

ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली असून सध्या तो पुणे पोलिसांच्या कोठडीत आहे. ललित पाटील हा कारगृहात होता. एका ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती. मागील तीन वर्षांपासून तो येरवडा कारागृहात होता. या तीन वर्षांच्या काळात नऊ महिने ललित पाटील ससून रुग्णालयात दाखल होता. विविध उपचाराच्या नावाखाली तो राहिला. त्यानंतर ससून रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी तो फरार झाला होता. पंधरा दिवस फरार राहिल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून अटक केली. दरम्यान, ललित पाटील याची प्रकृती पुन्हा बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

ललित पाटील याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला कोठडीत घेतले. पुणे पोलिसांच्या कोठडीत त्याची प्रकृती बिघडली आहे. त्याला पुन्हा जुन्या आजारांचा त्रास होत आहे. त्याच्यावर कोठडीतच उपाचार केले जात आहे. गेल्या चार दिवसांपासून त्याला पोटदुखी आणि हर्नियाचा त्रास सुरू झाला आहे. परंतु, त्याला आता ससून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न करता पोलीस कोठीतच उपचार दिले जात आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ललित पाटील याच्यावर यापूर्वी स्वत: ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर उपचार करत होते. त्याला टीबी आजारासह पाठदुखीचा देखील आजार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्याला हार्नियाही झाला होता. लठ्ठपणाचा आजारही त्याला दाखवण्यात आला होता.

हे ही वाचा:

यवतमाळ जिल्ह्यात सीतामंदिराचा जीर्णोद्धार

श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व आयसीसीकडून रद्द

हमासचा युनिट कमांडर ठार; हजारो नागरिकांनी उत्तर गाझा सोडले

पॅलेस्टिनी दहशतवाद्याचे कौतुक करणाऱ्या सुधन्वा देशपांडेंना IIT मध्ये आमंत्रण कशासाठी?

दरम्यान, ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत अनेक धक्कदायक खुलासे झाले आहेत. ललित पाटील याला रुग्णालयात पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सुविधा मिळत होत्या, तसेच ललित पाटील पोलिसांना १७ लाख रुपये द्यायचा असे अनेक गंभीर खुलासे चौकशीतून झाले आहेत.

Exit mobile version