ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या अटकेनंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत असताना या प्रकरणी सोमवार, ३० ऑक्टोबर रोजी ससून रुग्णायातील एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. या अधिकाऱ्याने राजीनामा का दिला याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरण हे राज्याच्या राजकारणात गाजत आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
ललित पाटील हा नाशिकमध्ये ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत होता. यामध्ये त्याला त्याच्या भावाची आणि साथीदारांची साथ होती. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, या प्रकरणी सोमवारी ससून रुग्णायातील एका अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ससून रुग्णालयाच्या कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांनी हा राजीनामा दिला आहे. डॉक्टर सुजित धीवारे असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी राजीनामा दिला आहे. ते ललित पाटील प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
या प्रकरणात नाव आल्यानेचं धीवारे यांनी राजीनामा दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ससून प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर सुधीर यांनी राजीनामा दिला का? अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. २७ सप्टेंबर रोजीचं त्यांची याठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. आता धीवारे यांनी राजीनामा दिलेला आहे.
हे ही वाचा:
आंध्र प्रदेशात दोन रेल्वेगाड्या धडकल्या, १४ ठार
केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास
आमदार अपात्रतेप्रकरणी दोन महिन्यांत निकाल द्या!
नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न!
दरम्यान, ललित पाटील याचा रुग्णालयातील मुक्काम वाढण्यासाठी म्हणून ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर हे मेहरबान असल्याचा एक पुरावा समोर आला आहे. ललित पाटील याच्यासाठी ससूनचे डीन संजीव ठाकूर यांनी वैद्यकीय अधीक्षकांना पत्र दिले होते. त्याच्यावर स्वतः डीन उपचार करत होते. ललित पाटीलचा रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी डॉक्टर संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला टी. बी. झाल्याचे पत्र मागील महिन्यात ससुनच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहिले होते.