पुण्याच्या ससून रुग्णालयातून पळालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी चेन्नईतून अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरू असून त्याच्याकडून धक्कादायक खुलासे केले जात आहेत. पोलिसांच्या तपासातून आलेल्या माहितीनुसार, ललित पाटील आणि त्याचा भाऊ भुषण पाटील त्यांच्या ड्रग्स फॅक्टरीतून दर महिना ५० लाखंचा निव्वळ नफा कमवायचे अशी माहिती उघड झाली आहे.
माहितीनुसार, २०२१ पासून नाशिकच्या शिंदे गावात एमडीचे उत्पादन सुरू होते. दर महिना ५० किलो एमडीची निर्मिती हे दोघे करायचे. इतकेच नाही तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये एमडीचा पुरवठा करायचे. तसेच ड्रग पेडलर्सच्या नेटवर्कच्या मदतीने हा एमडीचा पुरवठा वेगवेगळ्या शहरात केला जात होता. ड्रग्स फॅक्टरीतून दर महिना ५० लाखंचा निव्वळ नफा भावांना मिळत होता.
आतापर्यंत या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी १६ आरोपींना अटक केली आहे. तर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्यांचा साथीदार अभिषेक बलकवडेचा देखील लवकरच मुंबई पोलीस ताबा घेणार आहेत.
हे ही वाचा:
भारताचा विजयी चौकार, शतकांची ‘विराट’ झेप
चहाबिस्किटे देत आजीबाईंचा दहशतवाद्यांशी ‘लढा’
मराठा आरक्षण मिळावे म्हणून जालन्यातील कावळे यांनी मुंबईत घेतला गळफास
इस्रायलचा संबंध नाही; मुस्लिम जिहादी संघटनेच्या रॉकेटचा वेध चुकल्यानेच रुग्णालयात स्फोट
प्रकरण काय?
ललित पाटील (वय ३४, रा. नाशिक) याची चाकण येथील अमली पदार्थ विक्री प्रकरणात येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. त्यानंतर जून महिन्यात त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुख्य आरोपी ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पोलिसांना चकवा देऊन तो फरार झाला होता. ललित पाटील हा साकीनाका पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यातही मुख्य आरोपी आहे. ससून रुग्णालयाच्या परिसरात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून सुमारे सव्वादोन कोटींचे मेफेड्रोन अमली पदार्थ जप्त केले होते.