विमानतळावर मायलेकी सापडल्या २५ कोटींच्या हेरॉइनसह

विमानतळावर मायलेकी सापडल्या २५ कोटींच्या हेरॉइनसह

कॅन्सरच्या उपचाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या मायलेकींनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळातळावर २५ कोटी हेरॉईनसह अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई कस्टम विभागाने केली असून दोघीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघी मायलेकी १९ सप्टेंबर रोजी कतार एअरलाईन्सच्या विमानाने दोहामार्गे जोहान्सबर्ग येथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या होत्या.

कस्टम विभागाकडून त्याच्याजवळ असलेल्या सामानाची तपासणी करण्यात येत होती. दरम्यान दोघीजवळ असलेल्या ट्रॉली बॅगेवर संशय येताच कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता या बागेत एक कप्पा तयार करण्यात आला होता. या कप्प्यातून अधिकार्यांनी ५ किलो हेरॉईन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या हेरॉइनची आंतरराष्ट्रीय बाजारात २५ कोटी एवढी किंमत असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांनी दिली.

या दोघींची चौकशी केली असता या दोघी भारतात कॅन्सर या आजारावर उपचार करण्यासाठी आलेल्या असल्याची माहिती दोघीनी दिल्याचे अधिकारी यांनी म्हटलं आहे. या दोघींचे नावे आणि देशाबाबत अद्याप काही सांगता येणार नसल्याचे कस्टम अधिकारी सांगितले आहे.

हे ही वाचा:

जाऊबाई जोरात, मग पोलिसांनी काढली वरात!

खरी निधर्मिता की छद्म निधर्मिता

मुंबई वगळता सर्व महापालिकांत बहुसदस्यीय प्रभाग

कोरोनाग्रस्त कुटुंबियांना मोदी सरकार देणार ५० हजार रुपये

या दोघी मायलेकीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघीना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघीना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याचे कस्टम अधिकारी यांनी सांगितले.

Exit mobile version