सोने तस्करी टोळीला मदत, महिला पोलीस शिपाई बडतर्फ

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३५ लाखाच्या सोन्यासह विमानतळातून बाहेर पडताना पकडले होते.

सोने तस्करी टोळीला मदत, महिला पोलीस शिपाई बडतर्फ

आंतरराष्ट्रीय सोने तस्करी टोळीला मदत करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील महिला पोलीस शिपायाला पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी या महिला पोलीस शिपाईला सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३५ लाखाच्या सोन्यासह विमानतळातून बाहेर पडताना पकडले होते. संध्याराणी चव्हाण असे बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलीस शिपाईचे नाव आहे.

 

मुंबई पोलीस दलातील विशेष शाखा २ मध्ये असणाऱ्या संध्याराणी या महिला पोलीस शिपाईची ड्युटी विमानतळावर इमिग्रेशन येथे लावण्यात आली होती. एप्रिल २०२३मध्ये सीमाशुल्क विभागाच्या गुप्तचर युनिटने थायलंड येथून आलेल्या एका विदेशी नागरिकाला संशयावरून ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत तो एका आंतरराष्ट्रीय सोने तस्करी टोळीचा सदस्य असल्याची माहिती समोर आली. तसेच या टोळीला विमानतळावरून सोने बाहेर काढण्यासाठी विमानतळावर तैनात असलेली महिला पोलिस शिपाई मदत करीत असल्याची माहिती चौकशीत समोर आली.

 

हे ही वाचा:

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे एकाचा मृत्यू

मराठी गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

आयएसआयला मदत करणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक

असभ्य भाषेची राऊत यांना आता शरम वाटू लागली…

सीमाशुल्क विभागाने संध्याराणी चव्हाण या महिला पोलीस शिपाईवर पाळत ठेवून ड्युटीच्या अगोदर विमानतळावरून बाहेर पडत असताना तिला ताब्यात घेऊन महिला अधिकारी यांनी तिची झडती घेतली असता तिच्याकडे ६६८ ग्राम सोने सापडले. या सोन्याची किंमत ३५ लाख ५० हजार असल्याचे समोर आले.

दरम्यान, सीमाशुल्क विभागाने महिला कॉन्स्टेबलचा अहवाल तयार करून मुंबई पोलिसांकडे पाठवला होता. तिच्यावर मुंबई पोलीस दलात विभागीय चौकशी लावण्यात आली होती. या चौकशीत ती दोषी आढळून आल्यावर तिला नुकतेच सेवेतून बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती एका अधिकारी यांनी दिली.

Exit mobile version