मुंबई महानगर पालिकेत नोकरी लावतो असे सांगत एका महिलेने लुटल्याची घटना विठ्ठलवाडी येथे घडली आहे. या महिलेने दोघांना सुमारे आठ लाख रूपयांचा गंडा घातला असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात याप्ररकरणी अंजली राजाराम मुनेश्वर या महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हासनगरातील कॅम्प चार भागात राहणारे गिरिष निंबा पवार आणि त्यांचे चुलत भाऊ जगदीश पवार या दोघांना अंजली राजाराम मुनेश्वर या महिलेने विजय रामचंद्र धोत्रे उर्फ संदीप बावीस्कर यांच्या मार्फत मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी मुंबई महापालिकेचे कार्यालयीन शिक्के बनवून कागदपत्रावर खोट्या सह्या करून बनावट नियुक्ती पत्र देखील तयार करण्यात आले. त्यानंतर गुगल पेच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खात्यांवर या दोघांकडून आठ लाख रूपये घेतले.
हे ही वाचा:
मुख्यमंत्रीपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशिवाल्या मावळ्याचा!
‘अग्निवीराला शिस्त, कौशल्ये रोजगारक्षम बनवेल’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या निर्णायक सामन्यात पावसाची खेळी; मालिका बरोबरीत सुटली
विधान परिषदेच्या १० जागांसाठी आज रणधुमाळी!
मात्र, नियुक्तीपत्र बनावट असल्याचे कळताच गिरीष पवार यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अंजली राजाराम मुनेश्वर या महिलेविरूद्ध विठ्ठसवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर नोकरीच्या अमिषावरून सतर्क राहण्याचे आवाहन केले जाते आहे.