27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामा...आता वनअधिकारी पल्लवी चव्हाण यांचीही लैंगिक शोषणाची तक्रार

…आता वनअधिकारी पल्लवी चव्हाण यांचीही लैंगिक शोषणाची तक्रार

Google News Follow

Related

फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन कोल्हापूर संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना छळामुळे करावी लागलेली आत्महत्या विस्मरणात जात नाही तोवर वनखात्यातील आणखी अशाच एका घटनेला वाचा फुटली आहे. पल्लवी चव्हाण यांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न झाला आहे. कुपवाड पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली येथे उपवनसंरक्षक पदावर कार्यरत असणारे विजय माने यांच्यावर हा विनयभंग व लैंगिक शोषणाचा आरोप ठेवण्यात आला आहे.

यासंदर्भात फॉरेस्ट रेंजर्स असोसिएशन कोल्हापूर या संस्थेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वनमंत्री यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.

पल्लवी चव्हाण यांनी ६ मे रोजी कुपवाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. त्याबाबत या संघटनेने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विजय माने यांनी २८ एप्रिल रोजी पल्लवी यांचा विनयभंग करून त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. याआधी दीपाली चव्हाण यांच्याबाबतही असाच प्रकार घडला होता. उपवनसंरक्षक शिवकुमार याच्यावर तसा आरोप होता. पण शिवकुमार याने दबाव निर्माण केल्यामुळे आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे शेवटी दीपाली चव्हाण यांना कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले होते, आता पल्लवी चव्हाणही अशाच छळाला सामोऱ्या जात आहेत, असे संघटनेने आपल्या पत्रात म्हटले आहे.

हे ही वाचा:

राज्यसभेच्या ५७ जागांसाठी होणार १० जूनला निवडणूक

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

औरंगजेबाच्या कबरीसमोर ओवैसी झुकले

२०२२-२३ मध्ये बांधणार ‘या’ विक्रमी वेगाने महामार्ग

 

संघटनेने अशी मागणी केली आहे की, अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून विजय माने यांच्याविरोधात ३५४ व ३५४ (ए) या कलमांतर्गत अटकेची कारवाई व्हावी. जर अशी कारवाई दबावापोटी होऊ शकली नाही, तर संघटना तीव्र आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी.

हे पत्र सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनाही पाठविण्यात आले आहे. याबाबत भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट करत चिंता प्रकट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पलूसच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण यांनी उप वनसंरक्षक विजय मानेंविरोधात विनयभंगाचा FIR दाखल केलेला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री व वनमंत्र्यांकडे पत्र पाठवून न्याय मागितला, पण वनमंत्रालय मुख्यमंत्र्यांकडेच आहे म्हणजेच इथंही कारभार ठप्प आहे. न्याय मिळेल तरी कसा? निगरगट्ट मविआ सरकार आणखी एक दीपाली चव्हाण व्हायची वाट बघतेय काय?

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा