जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला असून या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.
पुलवामा जिल्ह्यातील गदुरा परिसरात गुरुवार, ४ ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात एक मजूर मृत्युमुखी पडला आहे तर आणखी दोन जण जखमी झाले आहेत. मोहम्मद मुमताज असे या मजुराचे नाव होते आणि तो मूळचा बिहारमधील रहिवाशी असल्याची माहिती आहे.
#Terrorists hurled grenade on outside labourers at Gadoora area of #Pulwama. In this #terror incident, one labourer died and two others were injured. Area cordoned off. Further details shall follow.@JmuKmrPolice
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) August 4, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “या घटनेत मृत्यू झालेला मजूर हा बिहारमधील साकवा पासरा येथील रहिवाशी आहे. मोहम्मद आरिफ आणि मोहम्मद मजबूल हे दोन जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. हे मजूरदेखील बिहारमधील रामपूरचे रहिवाशी आहेत. या दोन्ही मजुरांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा
कर्माची फळं भोगणारे पार्थ चॅटर्जी खात असत अडीच लाखांची फळे
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा दबदबा; १८ पदकांसह भारत सातव्या क्रमांकावर
झाडू मारण्याचे काम करता करता त्या स्टेट बँकेत झाल्या सहाय्यक महाव्यवस्थापक
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीरचे नसलेल्या पण तेथे कामानिमित्त गेलेल्या नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडत होत्या. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम वेगाने सुरू केली होती. यापूर्वीही काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी मजुरांवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात दोन मजूर जखमी झाले होते.