शिवसेनेचे कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे. यासंदर्भात पोलिस तपास करत आहेत.
मंगेश कुडाळकर यांच्या या दुसऱ्या पत्नी होत्या. पहिल्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी गाडीला झालेल्या अपघातात निधन झाले होते. या अपघातात मंगेश कुडाळकर आणि त्यांचा एक मुलगा बचावला होता. दुसऱ्या पत्नीला पहिल्या पतीपासून असलेल्या मुलाचा काही महिन्यांपूर्वीच कुर्ला पूर्व येथे मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला होता.
आमदार मंगेश कुडाळकर हे कुर्ला पूर्व नेहरूनगर केदारनाथ मंदिर या ठिकाणी राहण्यास आहेत. नेहरू नगर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली असून आत्महत्येचे कारण स्पष्ट होत नाही. आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव रजनी कुडाळकर असे आहे.
हे ही वाचा:
राऊत यांनी १०० कोटींचा आकडा आणला कुठून?
आमदार गणेश नाईक यांच्या प्रेयसीची तक्रार; बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा
दिल्ली हिंसाचाराप्रकरणी मुख्य आरोपी मोहम्मद अन्सारसह १४ अटकेत
‘जेम्स लेन यांच्या पुस्तकातील प्रत्येक वाक्य शिवरायांविरोधात’
रजनी कुडाळकर यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे. रजनी यांनी ही आत्महत्या का केली याचे कारण अस्पष्ट आहे. पोलिस त्यासदंर्भात तपास करत आहेत.
रजनी यांच्या मुलाचं काही महिन्यांपूर्वी निधन झाल्यानंतर त्या खचल्या होत्या. रजनी यांनी आत्महत्या केल्याची बातमी कळल्यानंतर मंगेश कुडाळकर यांना भेटण्यासाठी शिवसैनिक व नेत्यांनी संपर्क केला व त्यांचे सांत्वन केले.