29 C
Mumbai
Tuesday, April 1, 2025
घरक्राईमनामाकुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांकडे आणखी तीन गुन्हे दाखल

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांकडे आणखी तीन गुन्हे दाखल

खार पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

Google News Follow

Related

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. राजकीय वर्तुळातही याचे पडसाद उमटले असून थेट विधिमंडळ अधिवेशनातही याचे परिणाम दिसून आले. कुणाल कामरा याच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल झाली असून समन्स बजावूनही तो चौकशीसाठी हजर राहिलेला नाही. यानंतर कुणाल कामरा याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

कॉमेडियन कुणाल कामरा याच्याविरुद्ध खार पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक तक्रार जळगाव शहराच्या महापौरांनी दाखल केली होती, तर इतर दोन तक्रारी नाशिकमधील एका हॉटेल व्यावसायिकाने केल्या होत्या, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे. तीन गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणात कुणाल कामरावर आतापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी खार पोलिसांनी कुणाल कामरा याला चौकशीसाठी दोनदा बोलावले आहे, परंतु तो अद्याप चौकशीसाठी हजर झालेला नाही. तर, मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी कुणाल कामरा याच्याविरुद्ध दाखल झालेल्या अनेक एफआयआरच्या संदर्भात त्याला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायाधीश सुंदर मोहन यांनी अटींसह ७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. कुणाल कामरा याने त्याला अनेक धमक्या मिळत असल्याचा दावा करत ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

मुंबई पोलिसांनी २७ मार्च रोजी कामरा याला या प्रकरणात पुढील चौकशीसाठी ३१ मार्च रोजी खार पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी खार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात कामरा यांना बजावण्यात आलेला हा तिसरा समन्स आहे. पहिल्या दोन समन्समध्ये तो पोलिसांसमोर हजर राहण्यास अपयशी ठरला आहे.

हे ही वाचा : 

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात १६ नक्षलवाद्यांचा खात्मा

पश्चिम बंगालच्या मालदामधील हिंसाचारानंतर ३४ जणांना अटक

भूकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताकडून वैद्यकीय गोष्टींसह १५ टन मदत साहित्य रवाना

“पंतप्रधान मोदी अत्यंत हुशार व्यक्ती आणि माझे चांगले मित्र”, ट्रम्प असे का म्हणाले?

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली आहे. त्यांनी कुणाल कामराला इशारा देत माफीची मागणी केली आहे. कुणाल कामरा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल काही म्हणणे नसून ते स्वैराचाराकडे जाणारे नसावे, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
239,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा