कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

खार पोलिसांकडून बजावण्यात आले समन्स

कुणाल कामराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यानंतर शिवसनेचे नेते, शिवसैनिक संतापले असून त्यांनी निषेध म्हणून कुणाल कामराचा शो झाला त्या हॉटेलमध्ये घुसून शो च्या सेटची तोडफोड केली. सोमवारी दिवसभर या प्रकरणामुळे राज्यातलं वातावरण तापलेलं होतं, तर विधानसभेतही याचे पडसाद उमटले. दरम्यान कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून समन्स बजावण्यात आलं आहे.

कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता या दाखल केलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स कुणाल याला पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर कुणाल कामरा हा महाराष्ट्राबाहेर गेल्याचे बोलले जात आहे. खार पोलिसांचे एक पथक सोमवारी कुणाल कामराच्या घरी गेले होते. तिथे त्याचे आईवडील राहत असल्याने समन्सची एक कॉपी घरी देण्यात आली.

शोमुळे झालेल्या वादानंतर कुणाल कामरा महाराष्ट्राबाहेर असल्याने पोलिसांनी त्याला व्हॉट्सॲपद्वारे हे समन्स पाठवण्यात आले आहे. आता पोलिसांच्या समन्स नंतर कुणाल कामरा चौकशीला कधी हजेरी लावतो याकडे लक्ष असणार आहे. या वादानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर कुणालच्या घराच्या आसपास पोलिसांनी मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती.

हे ही वाचा : 

प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक!

नागपूर: दोन रुपये चढ द्या, पण हिंदू माणसालाच बळ द्या!

कुणाल कामराच्या वादग्रस्त कार्यक्रमानंतर हॅबिटॅट स्टुडिओवर कारवाईचा बडगा

…म्हणे राणा सांगाने बाबरला भारतात आमंत्रित केले होते! काय आहे सत्य?

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराला इशारा देत माफीची मागणी केली. कुणाल कामरा प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन केलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल काही म्हणणे नसून ते स्वैराचाराकडे जाणारे नसावे, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते पुढे म्हणाले की, हास्य, व्यंग याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत. राजकीय व्यंग झालं तरी त्याला दुसरा कुठला रंग देण्याचा प्रयत्न केलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण लोक आहोत. पण ते स्वैराचाराकडे जाणारं असेल, तर ते मान्य होणारं नाही,” असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याची खाज... | Dinesh Kanji | Kunal Kamra | Uddhav Thackeray | Eknath S |

Exit mobile version