25 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामा'प्रतीक पवार प्रकरण पोलिस दाबत आहेत का?'

‘प्रतीक पवार प्रकरण पोलिस दाबत आहेत का?’

Google News Follow

Related

आमदार नितेश राणे, पडळकर यांनी घेतली पोलिसांची भेट

अहमदनगर जिल्ह्यताील कर्जतमध्ये प्रतिक पवार या तरुणावरील हल्ला प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. हिंदुंवरील हल्ले खपवून घेणार नाही, नाहीतर हिंदुंना तिसरा डोळा उघडावा लागेल असा सज्जड इशारा भाजपचे नेते नितेश राणे यांनी दिला होता. प्रतिक मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेत नितेश राणे सोमवारी थेट अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये जाऊन धडकले. राणे यांनी रुग्णालयात जाऊन प्रतिक पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरही यावेळी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांनी पोलिस हे प्रकरण दाबत आहेत. या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करून त्यांना शिक्षा मागणी करतानाच नितेश राणे यांनी आता महाविकास आघाडीचे नाही तर शिंदे- फडणवीस यांचे सरकार आहे. आम्ही सर्व हिंदुत्ववादी सरकारचे प्रतिनिधी आहोत, असा इशारा दिला.

प्रतिकवर पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचे सांगण्यात येत असले तरी ते चुकीचे आहे. हा गुन्हा नुपूर शर्मा प्रकरणातून झाल्याचे पोलिस निरिक्षकांनी सांगितले आहे. पण पोलीस हे प्रकरण दाबत आहेत. पोलिसांनी दबावात काम करू नये व कोणीही पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. नुपूर शर्माच्या संदर्भात टाकलेल्या पोस्टवरून प्रतिक पवारवर हल्ला झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा योग्य तपास करावा अशी मागणीही नितेश राणे यांनी यावेळी केली.
प्रतिकला लक्ष्य केले जात आहे. हल्ल्याची घटना झाल्यानंतर त्याची पार्श्वभूमी खराब असल्याचे मविआ सरकारच्या काळात म्हटले जात होते. प्रतिक पवारच गुन्हेगारी वृत्ती असल्याचे दाखवले जात आहे. पण एनएआयएच्या तपासात हल्लेखोर मुलांचे सिमी जिहादी कनेक्शन आढळून आले आहे. त्यामुळे या हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवावा अशी मागणीही राणे यांनी केलेली आहे.

हे ही वाचा:

“पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे नेत्यांना माहित आहे का?” पाक पत्रकाराचा सवाल

क्रिकेटमध्ये महिलांची ऐतिहासिक कामगिरी; रौप्यपदकावर कोरलं नाव

अमृता फडणवीस यांना ‘त्या’ गाण्यात का दिसला उद्धव ठाकरेंचा चेहरा

केजरीवाल यांचे ‘फुकट’चे उद्योग

हल्ला प्रकरणावर बारीक लक्ष

या हल्ला प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारीक लक्ष आहे असे सांगून राणे म्हणाले की, कर्जत पोलीस निरीक्षक मस्ती करतोय त्याला आता कळवा महाविकास आघाडीचे सरकार नाहीये. जास्त मस्ती केली तर सगळ्या गोष्टींचे औषध या सरकारकडे असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा