मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन महिलेने केले भारताचे कौतुक !

मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन महिलेने केले भारताचे कौतुक !

मुंबईतील खार परिसरात विनयभंग झालेल्या यू-ट्यूबर कोरियन महिला ह्योजांग पार्कने भारताचे तोंडभरून कौतुक केले आहे. पार्कने सांगितले की तिने तिच्याशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल तक्रार केली नव्हती, परंतु पोलिस ठाण्यात तक्रार न करता त्वरित मुंबई पोलिसांनी प्रतिसाद दिला असून संपूर्ण जगासाठी भारत हे उत्तम उदाहरण बनले आहे. तसेच पोलिसांनी खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून ३५४ च्या अंतर्गत दोन्ही आरोपींवर गुन्हा ही दाखल केला आहे.

पार्क म्हणाली, या एका वाईट घटनेने माझा संपूर्ण प्रवास आणि इतर देशांना चुकीचा भारत दाखविण्याची माझी इच्छा नव्हती. भारतात मुंबई पोलिसांनी अतिशय वेगाने कारवाई केली. मी मागील तीन आठवड्यांहून अधिक काळ मुंबईत राहत आहे आणि या पुढे अधिक काळ मुंबईत राहण्याचा विचार करीत आहे.

महाराष्ट्रात लवकरच ‘ई-ऑफिस’ प्रणाली

स्वच्छता मोहिमेची CPL रंगतेय! ३५० स्वयंसेवक झाले सहभागी

कोरियन तरुणीशी लगट करणाऱ्या दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या

ब्रेन डेड तरुणाच्या अवयवांचे दान

हे प्रकरण काय आहे?

३० नोव्हेंबरच्या संध्याकाळी खारमध्ये लाइव्ह स्ट्रीमिंग करत असताना या कोरियन यूट्यूबरचा दोन तरुणांनी विनयभंग केला होता. तिला गाडीवर बसण्यासाठी हे तरुण सक्ती करत होते. याप्रकरणी १ डिसेंबर रोजी खार पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून, दोघांनाही न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई केली, असून पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार न करता कारवाई करून आरोपीला अटक केली आहे. पोलीस आपल्या पद्धतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Exit mobile version