32 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरक्राईमनामारायगड अपघातात चार वर्षीय मूल आश्चर्यकारकरित्या बचावले

रायगड अपघातात चार वर्षीय मूल आश्चर्यकारकरित्या बचावले

रायगड आणि सिंधुदुर्गातील अपघातात एकूण तेरा जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

भीषण अपघातांनी कोकण हादरलं असून मुंबई-गोवा महामार्गावर रायगड आणि कणकवलीजवळ अपघातात तब्बल तेरा जणांनी आपला जीव गमावला.आहे. कोकणासाठी गुरुवार हा घातवार ठरला आहे. एकापाठोपाठ एक अशा भीषण अपघातांनी कोकण हादरलं. सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये आज पहाटे झालेल्या दोन्ही अपघातात एकूण तेरा जणांचा मृत्यू झाला आहे.

एकीकडे मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जवळील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झाला. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.या अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

रायगडमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात,नऊ प्रवासी जागीच ठार
पहिला अपघात रायगड जिल्ह्या तील मुंबई-गोवा महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगडमधील माणगावजवळ रेपोली इथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली होती. ही कार मुंबईहून गुहागरच्या दिशेने जात होती. दोनच्या सुमारात इको कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये पाच पुरुष आणि तीन महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. तर या अपघातात चार वर्षीय बालक आश्चर्यकारक रीतीने बचावला असून अपघाताचं कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे.

हे ही वाचा:

गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकारांचे कान टोचले!

कम्पाउण्डरला डॉक्टरवर भरवसा नाही का?

समीर मयेकर, निकाळजे यांच्या विज्ञान प्रकल्पाचे यश

दाव्होसमध्ये १ लाख ३७ हजार कोटींचे करार

कणकवलीत चौघांचा मृत्यू, तर २१ जखमी
दुसरा अपघात हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये झाला. उपलब्ध माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात झाला आहे . पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गडनदी पुलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून अपघात झाला. अपघातग्रस्त खासगी आराम बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होती. बसमधून तब्बल ३६ प्रवासी प्रवास करत होते. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा