वर्ष संपत संपत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नवीन धक्का दिला आहे. नवीन वर्षात अनेक जण नवीन संकल्प सोडत असतात. सोमय्या यांनी देखील नवीन संकल्प सोडला आहे. त्यानुसार ते नवीन वर्षांमध्ये पाच नेत्यांचे घोटाळे बाहेर काढण्याच संकल्प भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोडला होता. यामध्ये ठाकरे परिवाराशी निगडित घोटाळ्याचा समावेश असल्याचे तयांनी म्हटले होते. त्याप्रमाणे सोमय्या दिवशी ऍक्टिव्ह झाले असल्याचे बघायला मिळत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमय्या रेवदंड्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात रश्मी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात फक्रर दाखल केली आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे.
रश्मी ठाकरे यांच्या रेवदंड्यातील कथित १९ बंगल्याप्रकरणी सोमय्या यांनी तक्रार दाखल केली आहे. या बंगल्याप्रकरणी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात व्यवहार झाला असल्याचा मुद्दा सोमय्या यांनी याआधीही उपस्थित केला होता. आता पुन्हा तोच मुद्दा उपस्थित करत रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
रश्मी ठाकरे यांच्या नावाने रेवदंडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत काही जमीन व्यवहार झाले. रश्मी उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून ९.५ एकर जागा आणि १९ बंगले विकत घेतले. स्वात:च्या नावावर चढवले. उद्धव ठाकरे यांनी २०२१-२२ मध्ये फे बंगले तेथून गायब करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला दिले असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन सौ रश्मी उद्धव ठाकरे यांचे १९ बंगले २००८ ते २०२१ पर्यंत आस्तित्वात होते ते अचानक गायब कसे झाले. चोरीला गेले कि गायब झाले असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणाचा आपण गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर सात दिवसात त्याचंही एफआयआर मध्ये रूपांतर होईल असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
२०२३ वर्ष आशेचे, आनंदाचे आणि भरपूर यशाचे जावो
चंदा कोचर यांचा ‘पद्म’ पुरस्कार काढून घेणार का?
अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये ग्रामपंचायतीच्या परवानगीने १९ बंगले बांधले होते. त्यांनी दरवर्षी नियमीतपणे ग्रामपंचायतीला घरपट्टी भरणा केली. २०१४ मध्ये ठाकरे व वायकर परिवाराने अन्वय नाईकांकडून सदर जमिनी बंगल्यांसह स्वतःच्या नावे विकत घेतले असे सोमय्या यांनी सांगितले . सोमय्या यांनी शनिवारी ट्विट करून उद्यापासून नवे वर्ष सुरू होत आहे. या नव्या वर्षात ठाकरे परिवाराचे १९ बंगले, अनिल परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे ४९ स्टुडिओ, किशोरी पेडणेकर यांच्या एसआरए सदनिका याबरोबरच मुंबई महापालिका घोटाळ्यांचा हिशोब पूर्ण करणार असल्याचे म्हटले होते