भारतीय जनता पक्षाचे आक्रमक नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे गटाला नवा दणका दिला आहे. दहिसर येथील जमिनीचा घोटाळा त्यांनी बाहेर काढला असून हा १७२२ कोटींचा घोटाळा असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या यांनी याबाबत उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी पैसे पोहोचविण्यासाठी हा घोटाळा करण्यात आला आहे. याप्रकरणी आपण लोकायुक्त, कॅग यांच्याकडेही तक्रारी दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुंबई पोलिसातही आपण तक्रार दिली असून त्यांनी माझा जबाब नोंदविला आहे, असेही सोमय्या म्हणाले. बिल्डरने हे १७०० कोटी रुपये व्याजासह देण्याची मागणीही सोमय्या यांनी केली आहे.
सोमय्या यांनी या संदर्भात सांगितले की, अजमेरा यांनी ही जमीन २.५५ कोटी रुपयांत घेतली आणि पालिकेने ३४९ कोटी रुपये दिले. बिल्डरने न्यायालयात अपील केले आहे. १७२२ कोटींची मागणी त्याने केली आहे. आपण यासंदर्भात बोरिवलीत तक्रार केली आहे. अल्पेश अजमेरा यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरले होते. त्यांनी २ कोटीत जमीन घेतली. मंत्रालयात चौकशीसाठी अधिकारी परवानगी मागणार आहेत.
हे ही वाचा:
आसाममध्ये भीषण अपघातात इंजीनियरिंगच्या ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू
उद्धवजी तुम्ही दिलेली मुदत संपली, आता…?
श्रीमंत गिर्यारोहक, व्यावसायिकीकरणामुळे एव्हरेस्ट मोहिमेत अधिक मृत्यू
महाराष्ट्रातील शूरवीरांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्काराने गौरविणार
सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावरही टीका केली आहे. दापोली येथील रिसॉर्ट तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परब यांनी बहुतेक ऑर्डर वाचलेली नाही. उच्च न्यायालयात आता सुनावणी सुरू आहे. त्यामुळे अटक न करण्याचे संरक्षण त्यांना आहे. त्यामुळे कोणतीही याचिका मागे घेण्याचा प्रश्नच कुठे येतो. सदानंद कदम जेलमध्ये आहेत तर अनिल परब बेलवर आहेत. अनिल परब यांनी म्हटले होते की, या प्रकरणात सोमय्या यांना नाक घासून आपली माफी मागावी लागेल.