भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाशिक दौऱ्यात लव्ह जिहादच्या प्रकाराकडे लक्ष वेधले. या प्रकरणात मुलीला फसविणाऱ्या मुस्लिम मुलावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल सोमय्या यांनी विचारला आहे.
या प्रकरणात मुस्लिम मुलाने अनुसूचित जातीच्या मुलीला फसवून नेऊन लग्न केले. या प्रकरणी निफाड पोलिसांची कामगिरी चांगलीच आहे. परंतु संबंधित मुलावर ती कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या हे गुरुवारी नाशिक दौऱ्यावरती आले होते. त्यावेळी ते पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांना भेटले. त्यांनी निफाड येथील अनुसूचित जातीच्या एका मुलीला रईस फकीर मोहम्मद सय्यदने अजमेरला दर्शनासाठी जात असल्याचे सांगून फसवणूक केली. त्या ठिकाणी निकाह करण्याता आल्याचाही आरोप आहे.
हे ही वाचा:
सन २०२७पर्यंत जीडीपीमध्ये भारत जगभरात अव्वल तीनमध्ये येणार
धर्मांतरित झालेल्या तरुणाने प्रेयसीचे डोके फोडले; लव्ह जिहादचा उलटा प्रकार
कर्नाटकनंतर आता राजस्थान काँग्रेस सरकारकडून ‘फुकट’ची वीज
काँग्रेसची दोन हजारांची योजना; सासू-सुनांमध्ये तू तू मै मै!
या सर्वप्रकरणी ४८ तासात निफाड पोलिसांनी मुलीला परिवाराच्या स्वाधीन केले. सदर मुलाचे आधीच लग्न झालेले असून त्याला दोन मुलेही आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर संबंधित पोस्ट करत दिली आहे. परंतु संबंधित मुलावरती कारवाई झाली नाही. ती कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. त्यासाठी ते पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांना भेटले. त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.