भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्या प्रकरणी आरोप केलेले राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख, आमदार नवाब मलिक, शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या गजाआड झाले आहेत. आणखी काही नेते तुरुंगात जाण्याची भविष्यवाणी करणाऱ्या सोमय्या यांनी आपला मोर्चा माजी मंत्री आणि कॉंग्रेस आमदार अस्लम शेख यांच्याकडे वळवला आहे. अस्लम शेख यांनी सीआरझेड आणि पर्यावरण कायदा धुडकावून मालाडमधील मढच्या एरंगळ गावात बेकायदेशीर फिल्म स्टुडिओ उभारला असल्याचा आरोप करत या प्रकरणी गंभीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
असलम शेख यांनी एरंगळ गावामध्ये तात्पुरता फिल्म स्टुडिओ उभारून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून तसेच खारफुटीचे नुकसान पोहोचवलेले आहे. त्याचप्रमाणे एरंगळ गावातल्या एमआयडीसीच्या जागेवर बेकायदेशीर डंपिंग केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात सोमय्या यांनी पर्यावरण खात्याकडे १८.७.२०११ आणि २०.७.२०२२ रोजी दोन तक्रारी केल्या होत्या. या पत्राची दखल घेऊन पर्यावरण खात्याने मुंबई महानगरपालिकेला या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या २४.२.२०२१ च्या पत्रामध्ये काही अटीनुसार एरंगळ गावात फिल्म स्टुडिओचे तात्पुरते बांधकाम करण्याच्या ३ प्रस्तावांची सीआरझेड शिफरस केली होती. ही वैधता ६ महिन्यांची होती. या प्रकरणात सीआरझेड कायद्याचा भंग झाला आहे का याची पडताळणी करून योग्य ती कारवाईची प्रकिया करावी, असे पर्यावरण खात्यानं मुंबई महानगरपालिकेला दिलेल्या निर्देशात नमूद केलं आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीत भारताला तिहेरी सुवर्णपदक
वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंजची ६४ कोटींची बँक मालमत्ता ईडीने गोठवली
केसरकर म्हणतात, तेव्हा उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते
स्टुडिओ तोडण्याची कारवाई करावी
यासंदर्भात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, अस्लम शेख – मढ मार्वे ₹1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितले मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे.