अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

परबांनी स्वतःच्याच कार्यालयावर मारला हातोडा

अनिल परब यांचे कार्यालय तोडले, किरीट सोमय्या भेट देणार

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आल्याचा दावा केला आहे. परब यांनी हजार स्वेअर फुटांचे अनधिकृत कार्यालय बांधले होते, असा आरोप आहे. एक फोटो ट्विट करत हे कार्यालय अनिल परब यांचेच असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी या ट्विट मध्ये केला आहे.

आज या तोडलेल्या ठिकाणाची पाहणी देखील करण्यासाठी सोमय्या दुपारी जाणार आहेत. अनिल परब यांचे वांद्रे येथील कार्यालय अनधिकृत असल्याची तक्रार सोमय्या यांनी लोकायुक्तांसमोर केली होती. त्यानंतर म्हाडानेही हे बांधकाम पाडण्याची दोन वेळा नोटीस अनिल परब यांना दिली होती. मात्र परब यांनी हे बांधकाम पाडले नाही. परब यांनी हे बांधकाम नियमित करण्यासाठी म्हाडाकडे प्रस्ताव दिला असल्याचे कळते पण, म्हाडाने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता . त्यामुळे सोमय्या यांनी पुन्हा म्हाडाला पत्र लिहून हे बांधकाम पाडण्याची मागणी केली. त्याची दखल घेत म्हाडाने हे बांधकाम पाडल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे.

अनिल परबांच्या अनधिकृत कार्यालयासमोरील पोलिस बंदोबस्त वाढवला असून भाजप नेते किरीट सोमय्या दुपारी सा डे बारा पर्यंत अनिल परबांच्या घरासमोरच असलेल्या कार्यालयाच्या पाहणीसाठी दाखल होणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  अनिल परबां विरोधात आमचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनीही म्हाडाकडे तक्रार केली होती. त्यांचे सरकार असल्यानं कारवाई झाली नव्हती. आता अनिल परब यांची आमदारकी रद्द व्हावी यासाठी तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडेंनी दिली आहे.

हे ही वाचा:

माझ्या हत्येचा कट  रचला जात आहे

आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

इंग्रजी राजवटीचा पाय खिळखिळा करणारा “लाल”

हवाई अभ्यासच्यावेळी सुखोई – मिराज विमाने हवेत धडक

जेरुसलेमच्या प्रार्थनास्थळात घुसुन दहशत वाद्यांचा गोळीबार

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे वांद्रे परिसरातील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक ५७ आणि ५८ या ठिकाणी कार्यालय आहे. हे जनसंपर्क कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात यावे अशा आशयाचे पत्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हाडाला दिले होते. या प्रकरणात काही वर्षांपूर्वी किरीट सोमय्या यांनी हे कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्याची मागणी करणारी याचिका लोकायुक्तांपुढे सादर केले होती. त्यापूर्वी विलास शेगले या व्यक्तीने देखील म्हाडाकडे तक्रार करून हे बांधकाम पाडण्यात यावं अशी मागणी केली होती.

Exit mobile version