किरीट आणि नील सोमय्या चौकशीसाठी गैरहजर

किरीट आणि नील सोमय्या चौकशीसाठी गैरहजर

‘आयएनएस विक्रांत’ कथित गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात किरीट आणि नील सोमय्या यांना ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स पाठवून शनिवारी चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र दोघेही पितापुत्र चौकशीसाठी आज गैरहजर राहिले असून त्यांच्या वकिलाने पोलिसांना पत्र देऊन चौकशीसाठी वेळ मागून घेतली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमय्या यांच्यावर ‘आयएनएस विक्रांत’ वाचविण्यासाठी काढलेले कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता, त्यानंतर निवृत्त सैनिक बबन पाटील यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात याप्रकरणी किरीट आणि नील सोमय्या यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

ट्रॉम्बे पोलिसांनी याप्रकरणी किरीट आणि नील सोमय्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून गुरुवारी त्यांना समन्स बजावले होते. या समन्समध्ये शनिवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
दरम्यान शनिवारी किरीट आणि नील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गैरहजर राहिले असून त्याच्या बाजूने त्याचे वकील हे सर्व शनिवारी पोलीस ठाण्यात दाखल झाले व त्यांनी पोलिसांना पत्र देऊन चौकशीसाठी वेळ मागून घेतली आहे.

हे ही वाचा:

‘शरद पवारांच्या घरावरचा हल्ला हा पोलीस इंटेलिजन्सचे मोठे अपयश’

आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या

पंतप्रधान पदाची खुर्ची जाण्याची चिन्ह दिसताच इम्रान खान यांची भारतावर स्तुतिसुमने

एसटी आंदोलन पेटले असताना मुंबईत एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

 

सोमय्या यांच्या वकिलांनी पत्रकाराशी बोलताना सांगितले की, किरीट सोमय्या यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होते, त्यासाठी सोमय्या दिल्लीला असल्यामुळे ते हजर राहू शकले नाही, आम्ही पोलिसांना पत्र लिहून चौकशीसाठी वेळ मागून घेतला असल्याचे वकिलांनी सांगितले आहे.

Exit mobile version