क्रूझ प्रकरणातील किरण गोसावीची सहकारी फसवणूकप्रकरणी ताब्यात

क्रूझ प्रकरणातील किरण गोसावीची सहकारी फसवणूकप्रकरणी ताब्यात

तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याची सहकारी शेरबानो कुरेशी हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. किरण गोसावी मात्र अद्याप फरार आहे. त्याचा शोध जारी आहे. कॉर्डिलिया क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) घातलेल्या धाडीवेळी किरण गोसावी तिथे उपस्थित होता. त्यावेळी तो चर्चेत आला.

एनसीबीच्या क्रूझ ड्रग्स प्रकरणात किरण गोसावी पंच म्हणून समोर आला होता. आता त्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांनी त्याची सहकारी शेरबानो कुरेशी हिला अटक केली आहे. नोकरी देण्याच्या नावाखाली पैसे उकळण्याच्या प्रकरणात शेरबानो कुरेशी हिला गोवंडीतून अटक करण्यात आली.

२०१८ मध्ये पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात किरण गोसावी आणि त्याची सहाय्यक शेरबानो कुरेशीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. चिन्मय देशमुख या तरुणाला मलेशिया येथे नोकरीसाठी पाठवतो, असे सांगून फसवणूक करण्यात आली होती. या नंतर दोघे फरार झाले होते. पालघरच्या केळवे सागरी पोलीस ठाण्यात देखील दोन तरुणांनी किरण गोसावी याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

 

हे ही वाचा:

दहिसरमध्ये नागरिकांना भीती डासांच्या कारंज्याची

गणेश मिरवणुकांना बंदी; ईदच्या मिरवणुकांना हिरवा कंदिल

कौतुकास्पद! लसीकरण १ अब्जच्या दिशेने

अमली पदार्थविरोधी कक्षाला आढळली मानखुर्द, गोवंडी ‘नशेत’

 

कॉर्डिलिया क्रूझवर झालेल्या पार्टीत छापा मारून एनसीबीने काही लोकांना ताब्यात घेतले होते. त्यात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा सहभाग होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. अजूनही आर्यन खान हा तुरुंगात असून २० ऑक्टोबरला त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. या छापेमारीत किरण गोसावी पंच म्हणून उपस्थित होता.

 

Exit mobile version