29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामा‘प्रभाकर साईल फितूर झाला आहे, त्याचे कॉल रेकॉर्ड्स तपासा!'

‘प्रभाकर साईल फितूर झाला आहे, त्याचे कॉल रेकॉर्ड्स तपासा!’

Google News Follow

Related

किरण गोसावीने केला खळबळजनक खुलासा

आर्यन खान अटक प्रकरणात प्रथमच किरण गोसावी याने जाहीररित्या आपली भूमिका मांडली असून त्यातून आता या प्रकरणाला गंभीर वळण लागणार आहे. गोसावीने म्हटले आहे की, माझ्याविरुद्धही षडयंत्र केले आहे. मी साक्षीदार आहे. कुठला साक्षीदार लगेच येऊन उभा राहतो. आर्यन खानचं नाव माझ्याकडे असलेल्या यादीत नव्हते. माझ्याकडे २७ लोकांची यादी होती. पण ज्यांनी नावे नव्हती ते लोकही तिथे होते. प्रभाकर साईल हा पैशांसाठी फितूर झाला आहे, त्याच्या आरोपांत काही तथ्य नाही. मी न्यायालयासमोर येऊन सगळे स्पष्ट करणार आहे. पण प्रभाकर साईलने खोटा एफआयआर दाखल केलाच तर पोलिसांना भोगावे लागले.

प्रभाकर साईलने रविवारी व्हीडिओ जारी करत समीर वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणात ८ कोटी रुपये मिळणार होते, असा दावा केला होता. त्यावरून महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत काही मतप्रदर्शन केले होते. मात्र आता बरेच दिवस गायब असलेल्या गोसावीनेच मीडियाशी संवाद साधत आपली भूमिका मांडल्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळणार आहे.

गोसावी म्हणाला की, आर्यन खानला अडकविण्याचा कोणताही प्लॅन वगैरे नव्हता. तेव्हा मी समोर यायला पाहिजे होते. मला त्यावेळी अनेक धमकीचे फोन आले.

गोसावीने त्या व्हीडिओबद्दलही सांगितले ज्यात गोसावी आर्यन खानच्या जवळ मोबाईल धरून बसलेला असताना व्हीडिओत दिसला. गोसावी म्हणाला की, आर्यन खानला आम्ही जेवायला सांगितलं होतं. पण तो जेवत नव्हता. त्याच्याकडे फोन नव्हता. त्यामुळे त्याला फोन लावून दिला होता.

कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचा आरोप होत होता, त्यावर गोसावी म्हणाला की,  हे सगळं फेक आहे. हे जर आरोप असतील तर प्रभाकर साईलचे सीडीआर रिपोर्ट मागवा. याची संपूर्ण चौकशी व्हावी. माझ्याकडे अजून काही माहिती आहे, जी मी न्यायालयात देणार आहे.

स्वतःबद्दल सांगताना गोसावी म्हणाला की, मी डिटेक्टिव्ह नाही. काही लोक गोमांस पकडतात त्यातलाच मी एक आहे. गोमांस नेणाऱ्या ७०-७५ गाड्या आम्ही पकडून दिल्या आहेत. गोसावी म्हणाला की, प्रभाकर साईल जे म्हणतो आहे त्याच्या आमच्याशी संबंध नाही. जर असे पैसे कमवायचे असते तर केव्हाच कमावता आले असते. प्रभाकर साईलचे कॉल डिटेल्स बाहेर काढा. माझं नाव या प्रकरणात घेतलं गेलं पण त्या प्रभाकर साईलला कोण पाठिंबा देत आहे, जनतेला माहीत आहे.

 

हे ही वाचा:

‘सुशांतसिंह प्रकरणात नितेश राणे लवकरच करणार हा गौप्यस्फोट

‘सरकारचा कारभार म्हणजे मिळेल तिथे खाऊ आणि सोबत राहू’

पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती

समीर वानखेडेंवरील आरोपांची एनसीबी करणार चौकशी

 

गोसावीने सांगितले की, मला जी माहिती मिळाली ती पोहोचवायची होती एनसीबीकडे. मनीष भानुशाली व सॅमचे कॉन्टॅक्ट होते. सॅमने रेफरन्स दिला. क्रूझवरून १६ जणांना आणलं होतं. ज्या गाडीत मी होतो त्याच गाडीत आर्यन होता. त्यामुळे त्याला मी हात धरून एनसीबीच्या कार्यालयात आणले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा