उमेश पाल हत्याकांडातील आणखी एका आरोपीला मातीत मिसळले!

उत्तर प्रदेश पोलिसांची कारवाई, दुसऱ्या आरोपीचे झाले एन्काऊंटर

उमेश पाल हत्याकांडातील आणखी एका आरोपीला मातीत मिसळले!

गुंड, दहशतवाद्यांना मातीत मिसळण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यानुसार गुंडांची साफसफाई करण्याचे काम वेगाने सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये गाजलेल्या उमेश पाल हत्याकांडातील आरोपी उस्मान चौधर उर्फ विजय कुमार याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंट केले. गुंड आतिक अहमदच्या गँगमधील या उस्मानला पोलिसांनी प्रयागराज येथे गोळ्या घातल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उस्मानला गोळ्या घालण्यात आल्या त्यानंतर त्याला स्वरूप राणी नेहरू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर २.५ लाखांचे इनाम जाहीर केले होते. उमेश पाल हत्याकांडात त्याने प्रथम गोळ्या घातल्या होत्या. २४ फेब्रुवारीला उमेश पालची हत्या झाली होती. बसपचे आमदार राजू पाल यांच्या हत्येचा उमेश पाल हा साक्षीदार होता. त्यात समाजवादी पक्षाचा आमदार आतीक अहमदचा भाऊ व माजी आमदार अश्रफ याचा सहभाग होता.

हे ही वाचा:

‘गिझा पिरॅमिड’चे उघडले नवीन रहस्य

ओळखीच्या लोकांना गुड बाय मेसेज करून शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या

दुःख, नैराश्याचे दहन करणारा आणि आनंदाचे रंग भरणारा होलिकोत्सव

न्या. शमीम अहमद म्हणाले, देशात गोवंशहत्या बंदी कायदा व्हावा!

याआधी अरबाझ या गुंडालाही उत्तर प्रदेश पोलिसांनी संपविले. नेहरू पार्क इथे ते एन्काऊंटर झाले होते.

भाजपाचे आमदार शलभ मणि त्रिपाठी यांनी यासंदर्भात ट्विट केले असून गुंडांशी आम्ही कशापद्धतीने वागू हे आम्ही आधीच सांगितले आहे. त्याप्रमाणे उमेश पालवर पहिली गोळी झाडणारा पोलिस एन्काऊंटरमध्ये मारला गेला आहे.

२००५मध्ये बसप आमदार राजू पाल यांची हत्या करण्यात आली होती. त्याचा एकमेव साक्षीदार उमेश पाल होता. गुंड आणि आमदार आतीक अहमदने ती हत्या घडवून आणली. राजू पालने आतीक अहमदचा भाऊ अश्रफ याला निवडणुकीत पराभूत केल्यामुळे त्याचा राजू पालवर राग होता. आतिक अहमद सध्या अहमदाबाद येथील साबरमती तुरुंगात आहे.

Exit mobile version