साक्षी नावाच्या १६ वर्षीय मुलीला १६ वेळा भोसकून आणि नंतर डोक्यात फरशी घालून मारणाऱ्या साहिलला आपल्या या निर्घृण कृत्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. या साहीलला ही हत्या केल्यानंतर उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून पोलिसांनी अटक केली.
साहीलने या मुलीला मारल्याचा सीसीटीव्ही व्हीडिओ सगळीकडे व्हायरल झाला आणि देशभरात खळबळ उडाली. २९ मे रोजी रात्री दिल्ली पोलिसांनी त्याची चौकशी केली. पण त्यावेळी त्याला आपल्या कृत्याचा जराही पश्चात्ताप झाल्याचे दिसले नाही. पोलिसांना अद्याप त्याने वापरलेले हत्यार सापडलेले नाही. तो सुरा ते शोधत आहेत.
हे ही वाचा:
लगोरी स्पर्धेच्या निमित्ताने शिक्षकाने मुलींचे केले होते लैंगिक शोषण, ठोठावली शिक्षा
भांडवलशाहीविरोधी कम्युनिस्ट नेत्याला ५० लाखांची मिनी कूपर पडली महागात
आंदोलक कुस्तीगीर मंगळवारी संध्याकाळी पदके गंगेत सोडणार
धानोरकर यांच्या निधनाने उमदे, लढवय्ये नेतृत्व गमावले!
सूत्रांच्या माहितीनुसार हा सुरा त्याने विकत घेतला होता. १५ दिवसांपूर्वीच त्याने हा कट आखला होता. पोलिसांनाही हा संशय आहे की त्याने साक्षी या मुलीचा खून करण्याचे आधीच ठरवले होते. पण त्याने हा चाकू कुठून आणला हे त्याने अद्याप सांगितलेले नाही. कदाचित त्याने या परिसरात गुरुवारी आणि रविवारी भरणाऱ्या आठवडी बाजारादरम्यान तो सुरा विकत घेतला असावा.
आता साहीलला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनुसार साहील आपले जबाब बदलत आहे. त्याने म्हटले आहे की, ती मुलगी झबरू नावाच्या मुलाशी मैत्री करत असल्याचे साहीलच्या लक्षात आले होते. साक्षी आणि तिची मैत्रीण भावना तसेच झबरू साहीलला या खुनाच्या आदल्या दिवशी भेटले होते आणि तिथे त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी झबरूने साहीलला साक्षीपासून दूर राहण्याची धमकी दिली होती. त्यावरून साहील संतापला आणि त्याने साक्षीला मारण्याचे ठरविले. पण त्याने सांगितलेल्या या गोष्टी खऱ्या आहेत की नाही, हे पोलिस तपासत आहेत.