हत्येच्या आदल्या दिवशी दाऊद शेख यशश्रीला भेटला, तिचे फोटो अपलोड करण्याची दिली होती धमकी

दाऊद शेखने लग्नासाठी पीडितेकडे तगादा लावत होता

हत्येच्या आदल्या दिवशी दाऊद शेख यशश्रीला भेटला, तिचे फोटो अपलोड करण्याची दिली होती धमकी

उरण येथील यशश्री शिंदेच्या हत्येनंतर आरोपी दाऊद शेख कसा पळाला, त्याने तिची हत्या कशी केली, तिच्याशी त्याचा त्याआधी संपर्क झाला होता का, याविषयीची माहिती आता समोर येऊ लागली आहे. दाऊद शेखला आता पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्यातून ही कबुली तो देत आहे.

यासंदर्भात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी दाऊदने उरण येथे यशश्रीची २५ जुलैच्या दुपारी हत्या केली. हत्येनंतर दाऊद उरण रेल्वे स्टेशनवर आला आणि त्याने बेलापूरला जाणारी लोकल पकडली. बेलापूरला पोहोचून पुन्हा त्याने पनवेल जाणारी लोकल पकडली. पनवेल रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर त्याने रिक्षाने कळंबोली गाठलं आणि तिथून कर्नाटकच्या गुलबर्ग्यातील शहापूरला जाणारी खाजगी बस पकडली.

शहापुरात पोहोचल्यावर त्याच्या आजीकडे एक दिवस राहून स्वतःचा मोबाईल तिथेच ठेवून तो डोंगराळ भागात निघून गेला. शहापूर परिसरात सर्व हिल परिसर असल्याने एका हिलवरून दुसऱ्या हिलवर आरोपी पायी फिरत असल्याचं समोर आलंय. नवी मुंबई पोलिसांची टीम आरोपीच्या मागावर होती मात्र भाषेची अडचण आणि तिथे तेवढा संपर्क नसल्याने आरोपीला शोधण कठीण जात होत.

नवी मुंबई पोलिसांनी स्थानिक दुभाषिकाची मदत घेतली आणि हिल परिसरात शोध घ्यायला सुरुवात केली. बऱ्याच शोधमोहिमेनंतर आरोपी नवी मुंबई पोलिसांच्या हाती लागला आणि त्याला अटक करण्यात आली. हत्येच्या काही मिनिटे आधी पीडितेने आपल्या मित्राला फ़ोन केला होता. मी अडचणीत आहे मला यातून सोडव असे म्हणत पीडितेने मित्राला फोन केला होता. या फोननंतर काही मिनिटातच झाली यशश्रीची हत्या.

हे ही वाचा:

राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा !

वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या १४५ हून अधिक; अजूनही बचावकार्य सुरू

ठाकरेंनी ब्रह्मास्त्रच काढले…

अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेवर दगडफेक करणारे महिलांच्या पुढाकाराने जेरबंद

लग्नासाठी तगादा लावणारा शेख यशश्रीला सोबत घेऊन जाण्यासाठी दबाव टाकत होता. भेटायला आली नाहीस तर आपले फोटो फेसबुकवर अपलोड करेन अशी धमकी आरोपीने दिली होती. आरोपीने काही फोटो फेसबुकवर अपलोडही केले होते आणि नंतर ते डीलीट केले. यशश्री आरोपीपासून पिच्छा सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे. यशश्रीने आरोपीचा नंबर ब्लॉक केल्यानंतर आरोपी दाऊद शेख हा मोहसीनचा मोबाईलवरील फोन करायचा.

हत्येच्या एक दिवस आधीही आरोपी यशश्रीला भेटला आणि हत्ये दिवशीही भेटला आणि हत्या केली. घटनेच्या आधी २२ तारखेला इथे आला. हत्येच्या एक दिवस आधी २४ तारखेलाही आरोपी पुन्हा भेटला. गुन्हा दाखल झाल्यानंतर वेगवेगळी पथक तयार करण्यात आली होती. संशयित आरोपी निश्चित करण्यात आला आणि शोध सुरु केला. दाऊद शेख याला गुलबर्गा येथून अटक करुन आणले आणि कोर्टात हजर करण्यात आले होते.

२५ तारखेला त्याने त्याच्याकडे असणाऱ्या चाकूने यशश्रीची हत्या केली. आरोपी लग्नासाठी पीडितेकडे तगादा लावत होता तसे बेंगलोर किंवा कर्नाटकात माझ्यासोबत राहायला चल असे म्हणत होता त्याला मुलीचा विरोध होता.
२५ तारखेला दुपारपर्यंत त्याने भेटण्यासाठी तगादा लावला होता. आरोपी आणि पीडित एकाच वर्गात शिकत होते पण दहावीनंतर आरोपीने शिक्षण सोडले. आरोपीचे लग्न झालेले नव्हते. पॉक्सोचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी अटक होता. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आरोपी कर्नाटकात गेला पण मधल्या काळात एक दोन वेळा येऊन गेला असल्याचं समोर आले आहे.

Exit mobile version