24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामापंजाबमध्ये खलिस्तान्यांचा उच्छाद, मुख्यमंत्री भगवंत मान गायब!

पंजाबमध्ये खलिस्तान्यांचा उच्छाद, मुख्यमंत्री भगवंत मान गायब!

पोलिसांवर दुसरा हल्ला, ६ पोलिस जखमी

Google News Follow

Related

एकीकडे पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळीने जोर धरलेला असताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मात्र कुठेही दिसत नाहीत, त्याबद्दल जनसामान्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, खलिस्तान चळवळीतला एक म्होरक्या लव्हप्रीत उर्फ तूफान याला सोडून देण्यात आले आहे. त्याच्या सुटकेची मागणी खलिस्तानी करत होते. त्याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा होता मात्र त्याविरोधातील पुरावे खलिस्तान्यांनी न्यायालयात सादर केल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे त्याला आता सोडण्यात आले आहे. या सगळ्या घडामोडीत पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हे मात्र प्रकर्षाने दिसते आहे

हे सगळे सुरू असताना आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे महाराष्ट्रात येणार आहेत. तिथे ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हेदेखील असतील. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे की, आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिकट असताना मान हे महाराष्ट्रात काय करत आहेत?

खलिस्तान विभाजनवादी नेत्यांनी पंजाबमधील पोलिस यंत्रणा आणि प्रशासनाला गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. एकेकाळी याच विघटनवादी शक्तींनी पंजाबमध्ये उच्छाद मांडला होता, त्याची पुनरावृत्ती होते आहे की काय, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या पाठीत चीनचा खंजीर

नियतीनेच घेतला उद्धव ठाकरेंचा राजीनामा

रशिया युक्रेन युद्धाला आज एक वर्ष पूर्ण 

अतुल भातखळकरांचे प्रयत्न फळले; झोपडीधारकांना मिळाले हक्काचे घर

खलिस्तानी नेता अमृतपालसिंग आणि त्याच्या अनेक समर्थकांनी अजनाला पोलिस ठाण्यावर आक्रमण केले. त्यांच्या एका साथीदाराला सोडण्यात यावे या मागणीसाठी या खलिस्तानी समर्थकांनी पोलिस ठाण्यावर आक्रमण केले. या सगळ्यांच्या हातात तलवारी होत्या. त्यांनी पोलिसांच्या सर्व बॅरिकेट्स हटवल्या आणि उच्छाद मांडला. त्यात सहा पोलिस जखमी झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पंजाबमध्ये झालेला खलिस्तानींचा हा दुसरा हल्ला आहे.

८ फेब्रुवारीला ३३ पोलिस अशा हल्ल्यात जखमी झाले होते. खलिस्तान्यांनी पोलिसांच्या हातून शस्त्र आणि दारूगोळाही हिसकावून घेतला होता. या समर्थकांमध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. मात्र हे सगळे होत असताना त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई झाली नाही. केवळ पाण्याचा फवारा सोडला तर या समर्थकांवर पोलिसांकडून कोणतेही पाऊल उचलले जात नव्हते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा