खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधू लांडाच्या प्रमुख साथीदाराला एनआयएकडून अटक

घातक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या दहशतवादी नेटवर्क प्रकरणात कारवाई

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधू लांडाच्या प्रमुख साथीदाराला एनआयएकडून अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने मोठीआ कारवाई करत खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधू उर्फ लांडा याच्या प्रमुख साथीदाराला अटक केली आहे. घातक शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी नेटवर्क प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग संधू उर्फ लांडा याचा प्रमुख साथीदार बलजीत सिंग उर्फ राणा भाई उर्फ बल्ली याला अटक करण्यात आली आहे. हा मूळचा मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील असून, त्याला गुरुवारी पंजाबमधून अटक करण्यात आली. बलजीत सिंग हा पंजाबमधील लांडाच्या एजंट्सना शस्त्रास्त्रांचा मोठा पुरवठा करत असल्याचे आढळून आले होते. एनआयएच्या माहितीनुसार, या शस्त्रांचा वापर मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जात होता. यातून उद्योजक आणि इतरांकडून खंडणी वसूल करण्यात येत होती.

गेल्या वर्षी १० जुलै रोजी एनआयएने या प्रकरणाची स्वतःहून (सुओ मोटो) दखल घेत तपास सुरु केला होता. या प्रकरणाच्या तपासात असे दिसून आले की पंजाब आणि इतर ठिकाणी हिंसक कारवाया करून भारतात अस्थिर वातावरण तयार करण्याचा खलिस्थानी दहशतवाद्यांचा कट आहे. विविध प्रतिबंधित खलिस्तानी दहशतवादी संघटनांच्या मोठ्या कटाचा एक भाग म्हणून बलजीत सिंगने सट्टा याला शस्त्रे पुरवली होती.

हे ही वाचा:

पूजा खेडकरने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिलेल्या पत्त्यावरील खेडकर कुटुंबियांची कंपनी अनधिकृत!

बदलापूरमध्ये ‘चादर गँग’चा धुमाकूळ, टायटनचं शोरूम फोडलं !

तर इम्तियाज जलील यांचे कोल्हापुरी पायताणाने स्वागत केले जाईल….

यूपीएससी नापास, तरीही परराष्ट्र सेवेत असल्याचा बनाव… ज्योती मिश्राची चक्रावून टाकणारी कहाणी

“लांडा आणि सट्टा हे दोघेही भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशातून सुत्रे हलवतात,” असे एनआयएने म्हटले आहे. खलिस्तानी दहशतवादी संघटनांवर कारवाईचा एक भाग म्हणून त्यांचा तपास सुरू आहे. कॅनडा स्थित गँगस्टर लखबीर सिंग लांडा याला गृह मंत्रालयाने याआधी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. लखबीर सिंग लांडा हा प्रतिबंधित खलिस्तानी गट बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य आहे. त्याचा २०२१ मधील मोहाली येथील पंजाब पोलिस गुप्तचर मुख्यालयावरील रॉकेट हल्ल्याच्या कटात सहभाग होता. डिसेंबर २०२२ मध्ये तरन तारनमधील सरहाली पोलीस ठाण्यावर झालेल्या आरपीजी हल्ल्यासह इतर दहशतवादी कारवायांमध्येही त्याचा हात आहे.

Exit mobile version