खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या साथीदाराला ठोकल्या बेड्या

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलची कारवाई

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूच्या साथीदाराला ठोकल्या बेड्या

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मोठी कारवाई केली आहे. सीख फॉर जस्टिसचा प्रमुख खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या साथीदाराला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. अटक करण्यात आलेला तरुण हरियाणाचा रहिवासी असून तो पन्नूच्या सूचनेवर काम करत होता.

माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतील काश्मिरी गेट फ्लायओव्हरवर खलिस्तान समर्थक भित्तिचित्रे सापडल्याप्रकरणी हरियाणातील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. गुरपतवंत सिंग पन्नू याच्या सांगण्यावरून त्याने दिल्ली आणि देशाच्या इतर भागात अशी चित्रे काढल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी दिली आहे.

हे ही वाचा:

वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

इस्रायलकडून लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

‘मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यास मी खूप उत्सुक’

अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स

तसेच, काश्मिरी गेट फ्लायओव्हरवर खलिस्तान समर्थक आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याने पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी एफआयआर नोंदवला होता. दहशतवादी पन्नू वेळोवेळी भारतविरोधी वक्तव्ये देत असतो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून भारतीय शीखांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आणि त्याच्या संघटनेच्याविरुद्ध भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. पंजाबमधील शीख तरुणांना शस्त्रे उचलण्यास आणि फुटीरतावादासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पंजाबमध्ये पन्नूवर देशद्रोहाचे तीन गुन्हे दाखल आहेत. पन्नूला गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केले होते.

Exit mobile version