खलिस्तानी नेता आणि वारिस पंजाब दे चा नेता अमृतपालसिंग याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. जालंधरमधील नाकोदार येथे शनिवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. शनिवारी त्याच्या अटकेसाठी पंजाब पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. केंद्रीय गृहमंत्रालय या पंजाब सरकारच्या या कारवाईवर लक्ष ठेवून होते.
अमृतपालसिंगच्या सहा सहकाऱ्यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. त्यांची अज्ञात स्थळी चौकशी करण्यात आली आहे.
खलिस्तानी नेता अमृतपालला अटक होणार हे कळल्यानंतर त्याने पळण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या ५० गाड्यांनी त्याचा पाठलाग केला.शाहकोट येथे अमृतपालचा ठिकाणा सापडल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्याआधी पंजाबमधील अनेक जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली. केवळ व्हॉइस कॉलची सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. १८ मार्चपासून १९ मार्च १२ वाजेपर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात येईल.
हे ही वाचा:
भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?
एक तास आधी या, तासभर आधी निघा…बिहार सरकारची मुस्लिम कर्मचाऱ्यांसाठी रमझानची सवलत
मराठी चित्रपटात महत्त्वाचे योगदान देणारे प्रसिद्ध अभिनेते भालचंद्र कुलकर्णी कालवश
अखेर लाल वादळ शमलं, शेतकरी मोर्चा स्थगित
अमृतपालचा पाठलाग करतानाचे काही व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आपल्या मागे पोलिस लागले आहेत आपल्याला वाचवा असे गाडीत बसलेला अमृतपाल बोलत आहे, असा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
That day he was sitting in a Thana, holding Guru Granth Sahib and challenging police to arrest him. Now when his wishes are chasing him, he is scared, running, looking for places to hide, appealing people to gather and save him. Why not fight brave man?pic.twitter.com/zMSs9T6La6
— THE SKIN DOCTOR (@theskindoctor13) March 18, 2023
दरम्यान पंजाब पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की, त्यांनी शांतता राखावी. पंजाब पोलिस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीप्रयत्नशील आहे. लोकांनी कोणत्याही परिस्थितीत खोट्या बातम्या पसरवू नयेत किंवा समाजात तेढ निर्माण होईल, अशी भाषा वापरू नये.
गेल्या महिन्यात अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांनी अमृतसर शहराच्या बाहेर असलेल्या अजनाला पोलिस ठाण्यात तलवारी आणि बंदुका घेऊन प्रवेश केला होता. पोलिसांशी त्यांची झटापट झाली होती.