पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहारा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या गिरीश चौधरी याना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत ४ दिवसाची वाढ केली असून १९ जुलैपर्यंत चौधरी यांचा मुक्काम ईडीच्या कोठडीत असणार आहे. गिरीश चौधरी हे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत.
पुण्यातील भोसरी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गिरीश चौधरी यांना ५ जुलै रोजी ईडीने अटक केली होती. २०१६ मध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना पुण्यातील भोसरी येथे जावई आणि पत्नी यांच्यावर येथील जमीन खरेदी केली होती. जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मनी लॉन्डरिंगचा गुन्हा दाखल करून गिरीश चौधरी याना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तसेच एकनाथ खडसे यांची ईडीने ९ तास चौकशी केली होती.
हे ही वाचा:
…आणि त्याने साकारली मोदी ‘बँक’
प्रतीक्षा संपली! दहावीच्या मुलांचा निकाल उद्या लागणार
गोवंडीतील उद्यानाला टिपूचे नाव द्यायला शिवसेनेचा छुपा पाठिंबा
टिपूला डोक्यावर घेऊन नाचण्याचे कसले उफराटे राजकारण
गिरीश चोधरी याची ईडी कोठडी गुरुवारी संपली असता ईडीने गिरीश चौधरी यांना न्यायालयात हजर केले. या प्रकणात आम्हाला काही साक्षीदार मिळाले असून ते पुढील आठवड्यात ईडी कार्यालयात येणार आहे, गिरीश यांची समोरासमोर चौकशी करायचे सांगून ईडीने न्यायालयाकडे ७ दिवसाची कोठडी मागितली होती. दरम्यान चौधीर यांचे वकील मोहन टेकवडे यांनी हि अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केलं आहे.