29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामाप्रवाशांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शारुख सैफी विरोधात युएपीए अंतर्गत होणार...

प्रवाशांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शारुख सैफी विरोधात युएपीए अंतर्गत होणार कारवाई

आगीची घटना दहशतवादी घटना म्हणून घोषित

Google News Follow

Related

केरळमधील कोझिकोड एक्स्प्रेसमध्ये मध्ये ज्वलनशील पदार्थ शिंपडून सहप्रवाशांना जिवंत जाळण्याचे क्रुरकृत्य शाहरुख सैफी याने केले होते. या आरोपीला रत्नागिरी येथून अटक करण्यात आली होती.केरळ पोलिसांच्या विशेष पथकाने रेल्वे आगीची घटना दहशतवादी घटना म्हणून घोषित केली आहे. या प्रकरणी सैफी याच्यावर युएपीए कायद्यांतर्गत तरतुदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केरळमधील कोझिकोड येथे २एप्रिल रोजी अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेसच्या एका डब्याला शाहरुख सैफी याने प्रवाशांवर ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावली होती. ही एक्सप्रेस कोरापुझा पुलावर असताना सैफी याने प्रवाशांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला . या घटनेत ९ जण भाजले, तर ३जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत एका लहान मुलासह तिघांचा रेल्वे रुळांवरून मृत्यू झाला. आगीपासून वाचण्याच्या प्रयत्नात ते पडले असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेनंतर शाहरुख फरार झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी शाहरुखच्या वडिलांनी दिल्लीच्या शाहीन बाग पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून केरळ पोलिसांनी शाहीन बंग गाठले आणि तपास केला. एक दिवसापूर्वी रत्नागिरीत शाहरुखचे लोकेशन ट्रेस झाले होते. डोक्याला मार लागल्याने ते रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आले होते. ट्रेनच्या बोगीला आग लावल्यानंतर खाली उतरताना पडल्याने तो जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शाहरुख उपचार न घेता रुग्णालयातून पळून गेला.

हे ही वाचा:

अमेरिका ठरला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश

महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्याला गालबोट, उष्माघातामुळे १० जणांचा मृत्यू

आता रेल्वे फाटक ओलांडण्याची गरज नाही; १०० उड्डाणपूल बांधले जाणार

गुडघेदुखीतून बरा होत रणदीप हुडा करतोय सावरकरांवरील चित्रपटातून पुनरागमन

आरोपी शाहरुख सैफीला ताब्यात घेतल्यानंतर १२ एप्रिल रोजी पुरावे गोळा करण्यासाठी अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस गाडीचे दोन डबे कन्नूरला आणण्यात आले होते. सैफीची पोलीस कोठडी १८ एप्रिल रोजी संपत आहे. कोझिकोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सैफीला ११ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफीने आपल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे.पोलिसांच्या चौकशीत सैफीने ही घटना एकट्याने घडवून आणल्याचे सांगितले असले तरी तपास यंत्रणांना सैफीच्या दाव्यावर विश्वास नाही. विशेष तपास पथकाचा भाग असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणातील आरोपींविरुद्ध युएपीएच्या तरतुदी लागू केल्या जातील आणि येत्या काही दिवसांत अधिक तपशील समोर येतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा