27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामापंतप्रधानांना आत्मघाती बॉम्ब हल्ल्याचे धमकी पत्र लिहिणारा  पोलिसांच्या जाळ्यात

पंतप्रधानांना आत्मघाती बॉम्ब हल्ल्याचे धमकी पत्र लिहिणारा  पोलिसांच्या जाळ्यात

वैयक्तिक वैमनस्यातूनशेजाऱ्याला गोवण्यासाठी लिहिले पत्र

Google News Follow

Related

आरोपीला केरळ पोलिसांनी शनिवारी अटक केली. पंतप्रधान मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर रवाना होणार आहेत. पंतप्रधानांविरोधात धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला शनिवार अटक करण्यात आली असल्याची माहिती कोची शहर पोलिस आयुक्त के. सेतु रामन यांनी सांगितले. या आरओपीचे नाव झेवियरला असे आहे. वैयक्तिक वैमनस्यातून त्यांनी शेजाऱ्याला गोवण्यासाठी पत्र लिहिले होते. आम्ही त्याला फॉरेन्सिकच्या मदतीने शोधून काढले असे सेतू रमण यांनी स्पष्ट केले.

कोची येथील एका व्यक्तीने मल्याळम भाषेत लिहिलेले हे पत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या कार्यालयात पाठवले होते. गेल्या आठवड्यातच के. सुरेंद्रन यांनी हे पत्र पोलिसांना सुपूर्द केले होते. पोलिसांनी या पत्रात पत्ता असलेल्या एन. के. जॉनी नावाच्या व्यक्तीचा शोध घेतला. राजीव गांधी यांच्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था होईल, अशी धमकी या पत्रात देण्यात आली होती. चौकशीच्या दरम्यान जॉनीने आपण पत्र लिहिल्याचा इन्कार केला. धमकीच्या मागे कोणीतरी माझा द्वेष करणारी व्यक्ती असू शकते अस जॉनने पोलिसांना सांगितले.

या धमकी प्रकरणानंतर परराष्ट्र राज्यमंत्री आणि भाजप नेते व्ही. मुरलीधरन यांनी संताप केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणार्‍या व्यवस्थेचा तपशील सार्वजनिक होणे आश्चर्यकारक आहे. मीडिया आणि हजारो लोकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ही माहिती लीक झाले. मात्र केरळ सरकार हातावर हात ठेऊन बसले आहे ही सर्वात आश्चर्याची बाब आहे. वास्तविक २४ तासांच्या आत जबाबदार व्यक्तीची ओळख पटवायला हवी होती, पण कारवाई होत नाही याबद्दल मुरलीधरन यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हे ही वाचा:

आता ‘वॉटर मेट्रो’ने घ्या केरळच्या बॅक वॉटरचा आनंद

सत्यपाल मलिक यांच्या अटकेचे वृत्त चुकीचे

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ एप्रिलला केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी तिरुअनंतपुरम सेंट्रल स्टेशनवर केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला तिरुअनंतपुरम आणि कासारगोड दरम्यान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्याचबरोबर ३,२०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान कोची वॉटर मेट्रो राष्ट्राला समर्पित करणार आहे. ही मेट्रो कोची शहराला अखंड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक हायब्रीड बोटीद्वारे कोचीच्या आसपासच्या १० बेटांना जोडेल. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी केरळमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कोची शहराचे पोलिस आयुक्त के. सेतु रमण रामन यांनी सांगितले की सुरक्षेसाठी २,०६० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा