केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचे मत
राजस्थानमधील उदयपूरमधील कन्हैया लालची तलवारीने गळा चिरून झालेल्या हत्येमुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. दरम्यान, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी या अशा घटनांना मदरसे जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
आरिफ मोहम्मद म्हणाले की, लक्षणे दिसत असूनही या आजाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांनी मदरशांमध्ये सुरू असलेल्या कट्टरपंथीयतेकडे लक्ष वेधले. “तिथे शिकणाऱ्या मुलांना हे शिकवले जात आहे की धर्माविषयी निंदा करणाऱ्यांसाठी शिक्षा म्हणजे शिरच्छेद आहे. हा देवाचा नियम म्हणून शिकवले जात आहे,” असे ते म्हणाले.
We worry when symptoms come but refuse to notice the deeper disease. Children are being taught in madrassas that punishment for blasphemy is beheading. It's being taught as the law of God…What's being taught there should be examined: Kerala Gov AM Khan on Udaipur beheading case pic.twitter.com/oqys2KFGyS
— ANI (@ANI) June 29, 2022
दरम्यान, राजस्थानमधील टेलर कन्हैया लाल हत्येचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार आहे. या हत्येतील आरोपी असलेल्या दोघांची एनआयएने चौकशी सुरू केली असून या हत्येमागे दहशतवादी गट कार्यरत आहेत का याचा तपास करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
“उदयपूर हत्या घटनेनंतर स्वा. सावरकरांचे विचार आठवतात”
बहुमत चाचणीत मनसेचा भाजपाला पाठिंबा
डोंबिवलीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
आम्ही उद्या मुंबईत येणार; कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
उदयपूरमध्ये कन्हैया लाल नावाच्या व्यक्तीचा दोन जणांनी दुकानात घुसून गळा चिरून खून केला. या घटनेनंतर कन्हैया याचा गळा चिरलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. तसेच हत्येची कबुलीही दिली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आणि आता एनआयएकडून चौकशी सुरू आहे.