केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी बुधवारी महिला व बालविकास विभागाला हुंड्याच्या मागणीवरून २६ वर्षीय महिला डॉक्टरच्या आत्महत्येची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजच्या शस्त्रक्रिया विभागातील पीजी विद्यार्थिनी शहाना मंगळवारी सकाळी तिच्या भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आली.पीडित शहानाचे कुटुंब हुंड्याची मागणी पूर्ण करू न शकल्यामुळे प्रियकराने लग्नास नकार दिला.प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने शहानाने आत्महत्या केली असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला.
प्रियकराच्या कुटुंबीयांनी हुंड्यात सोने, जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी केली असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.पीडितेचा प्रियकर मेडिकल पीजी डॉक्टर्स असोसिएशनचा प्रतिनिधी आहे.हुंड्याच्या मागण्या पूर्ण न करू शकल्यामुळे प्रियकराने शहानाशी नाते संपवण्याचा विचार केला.
हे ही वाचा:
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; नऊ विधेयकं मांडणार
दलालाला पद वाटण्याच्या मजबुरीला काय म्हणावे?
पहिला सीमा, नंतर अंजु अन आता पाकिस्तानच्या जवेरिया खानमची चर्चा!
रेवंथ रेड्डींकडे येणार तेलंगणच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी
दरम्यान,शहानाच्या मृत्यूनंतर मेडिकल कॉलेज पोलिसांनी अनैसर्गिकपणे मृत्यू झाल्याची नोंद केली आहे.केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षा सठीदेवी यांनी बुधवारी शहानाच्या आईची भेट घेतली.या प्रकरणी महिला आयोग पोलिसांनी केलेल्या कारवाईचा अहवाल मागवेल, सठीदेवी यांनी सांगितले.तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील करणार असल्याचे त्यानी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या, आरोपी डॉक्टरच्या कुटुंबाने पीडितेकडून हुंडा मागितल्याचे सिद्ध झाल्यास, हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सठीदेवी यांनी सांगितले.