28 C
Mumbai
Monday, April 14, 2025
घरक्राईमनामाकेनियन नागरिक असलेल्या महिलेला अटक, २० कोटींचे कोकेन जप्त

केनियन नागरिक असलेल्या महिलेला अटक, २० कोटींचे कोकेन जप्त

सीमाशुल्क विभागाने केली कारवाई

Google News Follow

Related

नैरोबीहून दोहामार्गे २० कोटी रुपयांचे १.७ किलो कोकेन तस्करी करणाऱ्या ४३ वर्षीय केनियन महिलेला मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने अटक केली. एमिली कानिन रोढा असे अटक करण्यात आलेल्या केनियन नागरिक असलेल्या महिलेचे नाव आहे.

सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार एमिली कानिन रोढा ही दोहा मार्गे मुंबईत आली होती, तिच्या सामानाची तपासणी केली असता त्यात संशयित पावडरयुक्त पदार्थ असलेले चार पॅकेट सापडले आणि फील्ड टेस्ट किटने त्यांची चाचणी केल्यावर, ते कोकेन हा अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे वजन १,७८९ ग्रॅम होते, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत २० कोटी रुपये आहे.आरोपी प्रवाशाने तिच्या ट्रॉली बॅगमध्ये हे कोकेन लपवले होते.

हे ही वाचा:

यूपीत माफियागिरी चालणार नाही

“पूल शॉटचा अंदाज चुकला, कोहलीचा खेळ संपला!

एआय स्वीकारण्यात भारत दक्षिण आशियाचे नेतृत्व करणार

“सिराज आला रे आला!” – विल्यमसनही भारावला!

सीमाशुल्क विभागाने सांगितले की, स्पॉट प्रोफाइलिंगच्या आधारे, नैरोबीहून दोहा मार्गे मुंबईला QR1342/6E1304 या फ्लाइटने आली असता संशयावरून तीच्या सामानाची झडती घेण्यात आली असता अमली पदार्थ मिळून आला.सखोल चौकशीनंतर, संशयित केनियन नागरिक असलेल्या महिलेला नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्याच्या संबंधित कलमांनुसार व्यावसायिक प्रमाणात ड्रग्जची तस्करी केल्याबद्दल अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान तिने कबुल केले की, नैरोबी येथे दुसऱ्या महिलेने तिला अमली पदार्थ सोपवला होता आणि दिल्लीतील तिच्या सहकाऱ्याला हा माल यशस्वीरित्या पोहोचवण्यासाठी १लाख केनियन शिलिंग (६६,११० रुपये) देण्याचे आश्वासन दिले होते .

तिने यापूर्वी भारतात अंमली पदार्थ किंवा इतर कोणत्याही प्रतिबंधित वस्तूंची तस्करी केली आहे का हे शोधण्यासाठी सीमाशुल्क अधिकारी तिचा प्रवास इतिहास देखील तपासत आहेत.तस्करी रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या तिच्या इतर साथीदारांची माहितीही तपास यंत्रणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
242,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा