ड्रग्सच्या नशेत सैरभैर झालेल्या एका केनियन नागरिकाने फुटपाथ वरून जाणाऱ्या ८ ते १० पादचाऱ्यावर धारदार शस्त्राने खुनी हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मागे असणाऱ्या टाटा गार्डन या ठिकाणी घडली.घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसानी या नशेबाज केनियन नागरिकाला ताब्यात घेतले असून जखमींना जी.टी. रुग्णालय आणि जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलीसानी गुन्हा दाखल करून नशेत असणाऱ्या केनियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
जॉन सुजास मेन्टी असे अटक करण्यात आलेल्या केनियन नागरिकाचे नाव आहे. जॉन हा केनिया देशातील बचाकोस सिटी येथे राहणारा आहे. मागील काही वर्षांपासून मुंबईत राहणारा जॉन हा अमली पदार्थ विक्रीचा धंदा करीत असून त्याला स्वतःला अमली पदार्थचे व्यसन आहे. बुधवारी दुपारी जॉन हा मुंबई उच्च न्यायालयाजवळ असणाऱ्या टाटा गार्डन येथील फुटपाथवर अमली पदार्थांच्या नशेत असताना येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना चाकुचा धाक दाखवून धमकी देऊन त्यांच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न करीत होता, त्याच्या या कृत्याला पादाचाऱ्यांनी विरोध करताच सैरभैर झालेल्या जॉन या केनियन नागरिकाने पादचाऱ्यावर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली. जो समोर येईल त्याच्यावर जॉन हा चाकूने हल्ला करून जखमी करीत होता.
या घटनेमुळे लोकांमध्ये दहशत निर्माण होऊन नागरिक सैरावैरा धावू लागले, या घटनेची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या केनियन नागरिकाला पकडण्याच्या प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याच्या हातातील चाकु ताब्यात घेऊन त्याला अटक केली.
हे ही वाचा:
आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांचे प्रभाग बदलले
निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून चोरले जिवंत काडतुसासह रिव्हॉल्व्हर
…म्हणून धनंजय मुंडेंना न्यायालयाने फटकारले!
राजस्थानमध्ये RSS च्या संयोजकांची हत्या; शहरात १४४ लागू
या हल्ल्यात ८ जण गंभीर जखमी झाले असून २ जण किरकोळ जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी जीटी रुग्णालय आणि जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहे. *जी.टी रुग्णालयातील जखमींची नावे.
सतीश-२७ वर्ष, शामराव कोमल,खान-३५ वर्ष (गंभीर दुखापत), अमिन बेंझामिन लोंढे- ६३ वर्ष.
जे जे हॉस्पिटल येथे आणण्यात आलेल्या जखमांची नावे
संदीप काशिनाथ जाधव ३८ वर्ष रा.देवनार गोवंडी, रोलँड जोसेफ मॅकेडो ६६ वर्षे रा. केरला कोची , हरिलाल राजकुमार ६५ वर्ष, रा.कल्याण पूर्व,राजु परदेशी ५५ वर्षे रा. महालक्ष्मी धोबी घाट