२५ समोसे पडले १ लाख ४० हजारांना

केईएम रुग्णालयातील डॉक्टरची फसवणूक

२५ समोसे पडले १ लाख ४० हजारांना

केईएम रुग्णालयातील एका डॉक्टरला २५ समोसांसाठी चक्क १ लाख ४० हजार रुपये मोजावे लागल्याचा धक्कादायक समोर आला आहे. एवढी मोठी रक्कम मोजून देखील डॉक्टरला समोशाची चव चाखता देखील आली नाही. फसवणूक झाल्यानंतर डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

परळच्या केईएम रुग्णालयातील २७ वर्षीय डॉक्टर रुग्णालयाच्या आवारातच आरएमओ कॉटर्समध्ये राहण्यास आहे.ओपीडीमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांनी आणि तेथील कर्मचारी यांनी पावसाळी पिकनिकचे ८ जुलै रोजी आयोजन केले होते. पिकनिकला जाताना वाटेत खाण्यासाठी डॉक्टरने सायन येथील प्रसिद्ध ‘गुरूकृपा’ समोसा ऑर्डर देण्याचे ठरवले.

डॉक्टर यांनी गुगलवर सर्च करून सायन येथील प्रसिद्ध ‘गुरुकृपा’ समोसा सेंटरचा क्रमांक मिळवळा, त्यानंतर डॉक्टर यांनी मोबाईल क्रमांकावर फोन करून २५ समोसांची ऑर्डर दिली. समोरच्या व्यक्तीने समोसांची दीड हजार रुपये अगोदर ऑनलाइन द्यावे लागतील असे सांगितले व त्यानंतर ऑर्डर व्हाट्सअप्प वर मेसेज करा असे सांगण्यात आले. डॉक्टर यांनी समोसांचे पैसे अगोदर देण्यास होकार देत मोबाईल क्रमांकावर २५ समोसांची ऑर्डर केली. ऑर्डर मिळाल्याच्या मेसेज डॉक्टर यांच्या व्हाट्सऍपला आला आणि त्याचसोबत गुरुकृपा असे लिहून बँकेचा खाते क्रमांक पाठवुन ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगण्यात आले.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशातील शाळा-कॉलेजची ‘सफाई’; व्यवस्थापकीय मंडळातून गुंड, माफिया बाहेर

कार्यालयात घुसून माजी कर्मचाऱ्याने आपल्या माजी ‘बॉस’ला तलवारीने केले ठार

उत्तर भारतातील धुवाँधार पाऊस हा हवामान बदलाचा परिणाम नव्हे!

मार्ग मोकळा झाला; विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची लवकरच नियुक्ती

सांगितल्या प्रमाणे डॉक्टरनी संबंधित खात्यावर समोसेचे दीड हजार रुपये पाठवून त्याचा स्क्रीन शॉट व्हाट्सअप्प वर पाठवून दहा वाजता ऑर्डर घेण्यासाठी येतो असा मेसेज केला. काही वेळाने त्या मोबाईल क्रमांकावरून डॉक्टर यांना पुन्हा कॉल आला व पेमेंट अडकला असून त्यासाठी ट्राजेक्शन आयडी तयार करावी लागेल असे सांगून डॉक्टर यांना काही लिंक पाठवून लिंकवर क्लिक करण्यास सांगण्यात आले.

डॉक्टरांनी लिंक वर क्लिक केल्यानंतर काही वेळाने त्यांच्या खात्यावरून २८ हजार रुपयांची रक्कम वजा झाल्याचा मेसेज बँकेकडून आला. ती रक्कम परत मिळविण्यासाठी डॉक्टरांना पुन्हा दुसरी लिंक पाठविण्यात आली असे करून डॉक्टर यांच्या खात्यातून १ लाख ४०हजार रुपये दुसऱ्या खात्यावर वळते झाले.

आपली फसवणूक झाल्याचे कळताच डॉक्टर यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.पोलिसांनी गुन्हा दाखल करून ज्या बँक खात्यावर पैसे ट्रान्स्फर झाले त्या खात्याची माहिती काढून खातेदाराचा शोध घेतला जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

Exit mobile version