केईएम रुग्णालयातील आहारतज्ञ महिलेच्या आत्महत्ये प्रकरणी वाडिया रुग्णालयातील अकाउंट विभातील कर्मचाऱ्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलुंड मधील नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भक्ती तुळसकर (४०) असे या आहारतज्ज्ञ अविवाहितेचे नाव आहे. मुलुंड पूर्व येथील गव्हाण पाडा येथे राहणारी भक्ती ही केईएम रुग्णालयात आहारतज्ज्ञ म्हणून नोकरी करीत होती.यापूर्वी तिने काही वर्षे वाडिया रुग्णालयात आहारतज्ज्ञ म्हणून नोकरी केली होती.
वाडिया रुग्णालयात अकाउंट विभागात काम करणारा अमोल निंबरे याच्यासोबत मागील दहा वर्षांपासून भक्तीचे प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाचे अमिष दिले होता. परंतु अमोल हा विवाहित असल्याचे कळताच तिला धक्का बसला होता. त्यानंतर देखील भक्तीने स्वतःला सावरून अमोल सोबतचे संबंध तोडण्याचा विचार केला होता, परंतु अमोलने स्वतःच्या पत्नीला मी सोडचिठ्ठी देऊन तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून भक्तीची फसवणूक करीत होता.
एकदा तर त्याने पत्नीला सोडचिठ्ठी दिल्याचे बनावट कागदपत्रे भक्तीला दाखवून तिच्याशी खोटं बोलला. या रागात भक्तीने ९ मार्च रोजी गव्हाण पाडा येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.
हे ही वाचा:
पाकिस्तानचा जीडीपी आणखी आटण्याची भीती
सर्वशक्तिमान, संगीतज्ञानमहंता हनुमान
मुंबईतील कोरोनाने ओलांडला २०० रुग्णांचा टप्पा
मारहाण प्रकरणातील महिला गर्भवती नसल्याचा नारायण राणेंचा दावा
भक्तीच्या आत्महत्येचे कारण नुकतेच समोर आल्यानंतर नवघर पोलिसानी अमोल निंबरे याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.