25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाकेदार दिघे, रोहित कपूर एकत्र काय करताहेत? सीसीटीव्हीचे चित्रण आले समोर

केदार दिघे, रोहित कपूर एकत्र काय करताहेत? सीसीटीव्हीचे चित्रण आले समोर

तरुणीने केली होती बलात्काराची तक्रार

Google News Follow

Related

सेंट रेजीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये एका कर्मचारी युवतीवर बलात्कार झाल्याची तक्रार एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात नोंदविली गेली आणि मोठी खळबळ माजली. या हॉटेलचे सीसीटीव्हीचे चित्रण आता समोर आले आहे. १ ऑगस्ट २०२२ चे हे सीसीटीव्ही चित्रण आहे. ज्यात रोहित कपूर आणि दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे दोघेही एकत्र दिसत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.

रोहीत कपूर या बड्या व्यावसायिकानं हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप पीडित युवतीनं केलाय तर पैसे घे आणि याची वाच्यता करू नकोस, नाहीतर तुला संपवू,  अशी धमकी केदार दिघे यांनी दिल्याची तक्रार या पीडित युवतीनं पोलिस ठाण्यात केली आहे.

दरम्यान,  दोन्ही संशयितांचा शोध एन एम जोशी मार्ग पोलीस घेत आहेत.  केदार दिघे याने सगळे आरोप फेटाळून हे षडयंत्र असल्याचा दावा केला आहे, पण सीसीटीव्हीत दोघेही दिसत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दोन दिवसांपूर्वी एका युवतीने हॉटेलमध्ये बलात्कार झाल्याची तक्रार केली होती. रोहित कपूर याने आपल्यावर अत्याचार केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स

आता पंधरा डब्यांच्या लोकलमध्ये स्वेटर घाला

संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली

टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

 

या घटनेसंदर्भात जी तक्रार नोंदविण्यात आली आहे त्यानुसार सेंट रेजिस हॉटेल, लोअर परळ येथे काम करत असलेल्या २३ वर्षीय महिलेने रोहित कपूर आणि केदार दिघे यांची नावे नोंदविली आहेत. खासगी कंपनीत ही महिला क्लब ऍम्बेसिडर म्हणून काम करते. क्लब मऍरेट मेंबरशिपची माहिती देणे हे तिचे काम आहे.

२८ जुलैला या महिलेला रोहित कपूरने मेंबरशिप घेण्याच्या बहाण्याने सेंट रेजिसमध्ये जेवणास बोलावले. जेवण झाल्यावर तो थांबलेल्या रूममध्ये तिला येण्यास भाग पाडले. तिथे रोहित कपूरने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यावेळी त्या महिलेने कुठेही वाच्यता केली नाही.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा