अखेर औरंगाबादच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निलंबित

अखेर औरंगाबादच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे निलंबित

विविध कारणांनी वादात आलेल्या औरंगाबादच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. शासनाने नावंदे यांच्या एकाधिकारशाहीस लगाम घालत चौकशी अहवालावर निर्णय दिला. त्याशिवाय त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

कविता नावंदे यांच्या कार्यकाळात २१ व्यायाम शाळा, साहित्य व क्रीडांगण विकास अनुदान या योजना राबविताना अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये अधिकाराचा वापर करत नावंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच निलंबन काळात कविता नावंदे यांना इतर खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. जर असे आढळून आल्यास भत्ते मिळणार नाहीत, असे महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सुनील हंजे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. त्यांच्या निलंबनानंतर खेळाडू, क्रीडा संघटना आणि या कार्यालयात छळ सोसावा लागलेल्या अधिकारी, कर्मचारी यांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले आहेत.

हे ही वाचा:

‘क्लीन चिट मिळाल्यामुळे मोदींचे नेतृत्व झळाळून निघाले’

फसलेला डाव आणि पवारांचा थयथयाट…

पाकने मृत घोषित केलेल्या २६/११ च्या हँडलरला घेतलं ताब्यात

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणारा तरुण खाली कोसळला

आतापर्यंत नावंदे यांची दोनवेळा चौकशी झाली आहे. यामध्ये निविदेद्वारे पुरवठादारांशी संगनमत करून कबड्डीच्या निकृष्ट दर्जाच्या मॅट खरेदी करणे, तसेच महानगर पालिका शाळांच्या क्रीडा साहित्याविषयी प्रस्ताव येण्याआधीच निधी मंजूर करणे व यातील काही शाळा अस्तित्वातच नसणे अशा प्रकारचे नावंदे यांच्यावर आरोप आहेत.

Exit mobile version