गेल्या आठवड्यापासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक काश्मिरी पंडिताचा मृत्यू झाला असून त्याचा भाऊ जखमी झाला आहे. गेल्या आठवड्यात बंदीपोरामध्ये एका स्थलांतरीत मजुराची हत्या झाली होती तर रविवारी नौहाट्टामध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा हल्ल्यात बळी गेला होता.
हत्या झालेल्या काश्मिरी पंडिताचे नाव सुनील कुमार आणि जखमी झालेल्या भावाचे नाव पिंटु कुमार असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. शोपियानच्या चोटीपोरा भागातील दहशतवाद्यांनी नागरिकांवर गोळीबार केला होता. जखमी पिंटुकुमार याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी बडगाम आणि श्रीनगरमध्ये दोन हातबाँब हल्ला करण्यात आला होता.
हे ही वाचा:
शिवमोग्गामध्ये सावरकर वि. टिपू सुलतान
७५ विधवा महिलांनी फडकावले ७५ राष्ट्रध्वज
भ्रष्टाचार, घराणेशाहीवर राहुल गांधींची बोलती बंद
पुलवामात दोन दहशतवाद्यांना टिपणाऱ्या देवेंद्र प्रताप सिंह यांना कीर्ती चक्र
काश्मीर खोऱ्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. वादग्रस्त काश्मीर प्रदेशात गुरुवारी अतिरेक्यांनी भारतीय सैन्याच्या चौकीवर हल्ला केला, ज्यात तीन सैनिक ठार झाले, तर भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितेत वाढ करण्यात आली. या दरम्यान झालेल्या गोळीबारात दोन हल्लेखोरांचा मृत्यू झाला होता. भारतातील एकमेव मुस्लिम बहुसंख्य प्रदेशातील राजौरी भागात हा हल्ला पहाटे झाला.